🌟नांदेड जिल्ह्यात लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर दि.२४ एप्रिल पासून ४८ तास बंद राहणार मद्य विक्री..!


🌟आदेशाचे उल्लंघन करून मद्यविक्री केल्याचे आढळल्यास संबंधित अनुज्ञप्ती रद्द करण्याची कारवाई होणार🌟

नांदेड (दि.२३ एप्रिल) - नांदेड जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर दि.२४ एप्रिल ते २६ एप्रिल अशी तब्बल ४८ तास मद्य विक्री बंद राहणार असून संपूर्ण जिल्ह्यातील मद्य विक्रेत्यांना तसे आदेश नांदेड जिल्हा प्रशासनाकडून जारी करण्यात आलेले आहेत.

नांदेड जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी निवडणूक प्रक्रिया कार्यान्वित असून निर्धारित कार्यक्रमानुसार हिंगोली लोकसभा-१५ व नांदेड लोकसभा-१६ साठी मतदान दि.२६ एप्रिल २०२४ रोजी तर मतमोजणी दि.०४ जुन २०२४ रोजी होणार आहे यावेळी निवडणुकी संदर्भात होत असलेल्या मतदानाची प्रक्रिया भय मुक्त व निर्भयपणे शांततेत पार पडवण्यास मदत व्हावी व शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ चे कलम १३५ (सी) तसेच महाराष्ट्र विदेशी मद्य रोखीने विक्री, विक्रीच्या नोंदवह्या इत्यादी नियम १९६९ च्या नियम ९ ए (२) (सी) (१) महाराष्ट्र देशी मद्य नियम १९७३ च्या नियम २६ (१) (सी) (१) तसेच महाराष्ट्र ताडी दुकाने अनुज्ञप्ती देणे आणि ताडी झाडे छेदणे नियम १९६८ च्या नियम ५ (ए) (१) महाराष्ट्र दारू बंदी कायद्याच्या कलम १४२ (१) तरतूदी नुसार नांदेड जिल्ह्यातील  सर्व ठोक व किरकोळ अनुज्ञप्ती मद्य विक्री बंद ठेवण्याचे आदेश नांदेड जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहेत.

हा आदेश नांदेड जिल्ह्यातील लोकसभा निवडणूक २०२४ साठी मतदान होत असलेल्या ठिकाणी मतदान संपण्यापूर्वी ४८ तास अगोदर म्हणजे दि.२४ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ०६-०० वाजेपासून ते दि.२६ एप्रिल २०२४ रोजी मतदान संपेपर्यंत,मतदानाच्या दिवशी २६ एप्रिल २०२४ रोजी संपूर्ण दिवस तसेच मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी होत असलेल्या ठिकाणी ०४ जुन २०२४ रोजी मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अंमलात राहील तसेच लोहा विधानसभा मतदार संघ क्षेत्राच्या तीनही बाजूला असलेल्या कार्यक्षेत्रात २६ एप्रिल २०२४ रोजी मतदान आहे त्यामुळे मतदानाच्या दिवशी लोहा विधानसभा मतदारसंघ क्षेत्रामधून नांदेड जिल्ह्यातील इतर क्षेत्रात मद्य अवैधरित्या वाहतूक,विक्री होण्याची शक्यता आहे तसेच लोहा व कंधार तालुक्यातील ठराविक कार्यक्षेत्रात २६ एप्रिल २०२६ रोजी मतदान होत आहे.

त्यामुळे या आदेशाचे उल्लंघन करून मद्यविक्री करीत असल्याचे आढळून आल्यास संबंधित अनुज्ञप्ती रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.....


 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या