🌟परभणी लोकसभा मतदार संघ सार्वत्रिक निवडणूक : जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी बजावला मतदानाचा हक्क...!


🌟यावेळी श्री. गावडे यांनी मतदान केंद्रातील केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी यांच्याशी संवाद साधला🌟


परभणी (दि.26 एप्रिल) : 17-परभणी लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी आज सकाळी 7 वाजेपासून मतदान प्रक्रियेस शांत वातावरणात सुरुवात झाली. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक‍ निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे यांनी परभणी येथील मराठवाडा हायस्कुल येथील दिव्यांग मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला.

 यावेळी श्री. गावडे यांनी मतदान केंद्रातील केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी यांच्याशी संवाद साधुन मतदान प्रक्रियेबाबतची माहिती घेतली. तसेच मतदानासाठी आलेल्या मतदारांशी देखील त्यांनी संवाद साधत मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी मतदार संघातील विविध मतदान केंद्रावर युवा मतदारासह ज्येष्ठ मतदार आणि महिला मतदार देखील उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावला.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या