🌟शिवालय उद्योग समुहाच्यावतीने रविवार दि.०७ एप्रिल रोजी सामुहिक बौध्द मंगल परिणय सोहळा....!


🌟नांदेड उत्तरमधील आत्महत्याग्रस्त शेतकरी,कष्टकर्‍यांच्या मुलींचे होणार विवाह🌟


नांदेड : येथील शिवालय उद्योग समुहाच्यावतीने नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघातील आत्महत्या ग्रस्त, अल्पभूधारक शेतकरी व कष्टकर्‍यांच्या मुलींचा सामुहिक बौध्द मंगल परिणय  विवाह सोहळा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती शिवालय उद्योग समुहाच्या अध्यक्षा सौ.संध्याताई बालाजीराव कल्याणकर यांनी दिली.नांदेड उत्तर विधानसभ मतदार संघातील आत्महत्याग्रस्त, अल्पभूधारक, कष्टकर्‍यांच्या मुलींचे सामुहिक विवाह लावुन शिवालय उद्योग समुहाच्यावतीने सामाजिक भान जपण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 

सदर सामुहिक बौध्द मंगल परिणय सोळा रविवार ७ एप्रिल रोजी सकाळी ११.३० वाजता लक्ष्मी गार्डन मंगल कार्यालय तरोडा बु.येथे आयोजित करण्यात आला आहे. या विवाह सोहळ्यात वधु-वरास कन्यादानरुपी मणीमंगळसूत्र, जोडवे, संसारोपयोगी भांडी, लग्नाचा ड्रेस, बुट व सॅन्डल देण्यात येणार आहे. या सामुहिक विवाह सोहळ्यास सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शिवालय उद्योग समूहाच्या अध्यक्षा संयोजक सौ.संध्याताई बालाजीराव कल्याणकर व विनीत मंगेश कदम, अ‍ॅड.धम्मपाल कदम यांनी केले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या