🌟वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाडसी कारवाई.....!


🌟चारचाकी वाहनासह ५ लाखापेक्षा जास्त रूपयांचा अवैध दारुचा मुद्देमाल जप्त🌟

फुलचंद भगत

वाशिम :- लोकसभा निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने आचारसंहीतेच्या कालावधीत जिल्हयात होणा-या अवैध दारु विक्री, वाहतुकीवर आळा घालण्यासाठी विशेष पथक तयार केले आहे. सदर पथकास मिळालेल्या गोपनिय व खात्रीशीर माहितीप्रमाणे ११ व १२ एप्रिल रोजी वाशिम जिल्ह्यातल्या मंगरुळपीर तालुक्यातील मौजे माळशेलु येथे एका दुचाकी वाहनावरुन देशी दारुची अवैधरित्या वाहतुक होत असतांना दोन आरोपींना अटक केलेली असुन त्यांच्या ताब्यातुन दुचाकी वाहनासह देशीदारुचे तिन बॉक्स जप्त करण्यात आले. तसेच रिसोड शहरातुन अवैद्यरित्या देशी, विदेशी दारुची वाहतुक होत असल्याने सदर ठिकाणी संशयीत वाहनाची तपासणी केली असता एक चार चाकी वाहन क्र. एमएच ३० बीडी ३९१७ अवैद्यरित्या देशी दारुच्या एकुण ९६ बॉटल, विदेशी दारुच्या एकुण १०३ बॉटल व बिअर मद्याच्या एकण २४ बॉटल जप्त करण्यात आल्या .

 सदर कारवाईमध्ये वाहनांसह एकुण ५ लाख ८५ हजार ९४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यामध्ये आरोपी नामे पंकज शारदाप्रसाद दिक्षीत, ज्ञानेश्वर प्रकाश गावंडे रा. कव्हर नगर अकोला जि. अकोला तसेच गोविंदा शंकर घनगाव . कार्तीक घनगाव रा. पिंजर ता. बार्शिटाकळी जि. अकोला यांचे विरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ च्या विविध कलमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच आचारसंहीता कालावधीमध्ये देशी विदेशी दारुची ठोक विक्री केल्याचे निदर्शनास आल्याने रिसोड शहरातील ईलाईट वाईन शॉप या अनुज्ञप्ती विरुद्ध विभागीय नियमभंग प्रकरणाची नोंद करण्यात आलेली असुन पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरिक्षक जी.व्ही. पाटील करीत आहे. तसेच यापुढेही अवैध मद्य विक्री करून आदर्श आचारसंहीतेचे उल्लंघन करणा-यांविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभाग कारवाई करणार आहे.

सदर कारवाईत के. डी. वराडे,एस.डी.चव्हाण के.ओ.वाकपांजर,निवृत्ती तिडके, दिपक राठोड, स्वप्नील लांडे, बाळु वाघमारे,विष्णु मस्के,नितीन चिपडे, ललीत खाडे,पी.एम.वाईकर यांचा समावेश आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या