🌟पभणी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक : निवडणूक निरीक्षक (पोलीस) डॉ.विष्णुकांत यांची नियुक्ती....!


🌟त्यांच्याशी भ्रमणध्वनी क्रमांक 8623058715  या क्रमांकावर संपर्क साधता येईल🌟

परभणी (दि.4 एप्रिल) : भारत निवडणूक आयोगाने 17-परभणी लोकसभा मतदार संघासाठी राजस्थान केडरचे डॉ. विष्णुकांत (भा.पो.से.) यांची निवडणूक निरीक्षक (पोलीस) म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांचे बुधवारी सायंकाळी परभणी येथे आगमन झाले आहे. मतदार किंवा राजकीय पक्ष, उमेदवार यांना निवडणूक निरिक्षक डॉ.विष्णुकांत यांच्याशी संपर्क साधण्यासाठी भ्रमणध्वनी क्रमांक 8623058715  या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

निवडणूक कालावधीत डॉ. विष्णुकांत यांचा मुक्काम सावली शासकीय विश्रामगृह, वसमत रोड, परभणी, येथे असणार आहे. सहायक पोलीस निरक्षक श्री. विकास कोकाटे, भ्रमणध्वनी क्रमांक 9423861363 यांची निवडणुक निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी म्हणुन नियुक्ती करण्यात आली असल्याचे जिल्हा निवडणूक यंत्रणेने कळविले आहे......

****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या