🌟पुर्णा तालुक्यातील प्रमुख राज्यमार्गांवरील अर्धवट कामे उठली जनसामान्यांसह वाहनधारकांच्या मुळावर....!


🌟सुरक्षेसाठी कुठल्याही प्रकारची उपाययोजना न करता पुल बांधकामासाठी खोदलेल्या खड्यात चारचाकी कोसळली ०२ जखमी🌟 

पुर्णा (दि.२९ एप्रिल) - पुर्णा तालुक्यातील पुर्णा-झिरोफाटा-परभणी तसेच पुर्णा-गौर-चुडावा-लिंबगाव-नांदेड या राज्यमार्गावर छोट्यामोठ्या मुलांसह उड्डाण पुलांची देखील काम चालू असून सदरील पुल बांधकामासाठी संबंधित गुत्तेदारांनी खोदलेले खड्डे जनसामान्यांसह या मार्गांवरुन प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसाठी अक्षरशः जिवघेणे ठरत असून असीच गंभीर घटना आज सोमवार दि.२९ एप्रिल २०२४ रोजी मध्यरात्री ०२-०० वाजेच्या सुमारास पुर्णा-झिरोफाटा मार्गावरील माटेगाव येथे घडली झिरोफाट्याकडे जाणारी इन्होवा कार क्रमांक एम.एच.२६ बीजी ७७०७ ही चारचाकी पुलाच्या बांधकामासाठी खोदलेल्या खड्यात पडल्याची दुर्दैवी घटना घडली सुदैवाने कुठल्याही प्रकारची जिवीत हाणी झाली नसली तरी या कार मधील दोघे जन जखमी झाले असून या कारचे बरेच नुकसान झाले आहे.

 पुर्णा तालुक्यात राज्यमार्गांवर अनेक ठिकाणी छोट्यामोठ्या पुलांची बांधकाम चालू असून संबंधित कामांच्या गुत्तेदारांनी सुरक्षे संदर्भात कुठल्याही प्रकारची पुर्वकल्पना देणारे बोर्ड किंवा अन्य उपाययोजना न केल्यामुळे गंभीर अपघात घडत आहेत असाच प्रकार तालुक्यातील माटेगाव येथे घडला या मार्गावरील थूना नदीच्या पुलाचे उंची वाढवण्याचे काम सुरू असून या संबंधीत पुलाचे बांधकाम करणाऱ्या गुत्तेदाराने पुल बांधकामासाठी खड्डे केले असून जुना पुल तोडण्यात आल्याने या मार्गावरुन जाणारी इन्होवा कार खड्यात कोसळून अपघात झाला पुलाचे बांधकाम सुरू असल्याचे बोर्ड अथवा बारिकेट नसल्याने आज सोमवार दि.२९ एप्रिल रोजी मध्यरात्री हा अपघात झाला घटना स्थळी माटेगाव येथील पोलिस पाटील स्वामी यांनी भेट दिली.गाडीतील दोन प्रवाश्यांना किरकोळ दुखापत झाली असून ही कार नांदेड जिल्ह्यातील सूनेगाव येथील असल्याचे समजते.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या