🌟परभणी जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना महामंडळाच्या कर्ज योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन....!


🌟राष्ट्रीय दिव्यांगजन महामंडळाची दिव्यांग स्वावलंबन कर्ज योजना राबविण्यात येत आहे🌟

परभणी (दि.06 एप्रिल) : जिल्ह्यातील 18 ते 60 वयोगटातील दिव्यांगाना स्वंयरोजगारासाठी अल्प व्याज दराने कर्ज स्वरुपात अर्थसहाय्य करण्याकरिता महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळामार्फत राज्य शासनाची वैयक्तिक थेट कर्ज योजना व राष्ट्रीय दिव्यांगजन महामंडळाची दिव्यांग स्वावलंबन कर्ज योजना राबविण्यात येत आहे.

महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या कर्ज योजनांचा लाभ जास्तीत-जास्त दिव्यांग व्यक्तींना मिळण्यासाठी महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाच्या www.mshfdc.co.in या संकेतस्थळावरील डाऊनलोडमध्ये कज्र योजनांचे अर्ज व महामंडळाचे माहिती पत्रक http://mshfdc.co.in/index.php/2013-04-12-13-20-56 या लिंकवर उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत......

****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या