🌟परभणीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेनंतर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची सभा....!


🌟परभणी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी की महायुती ? प्रचाराच्या अंतिम टप्प्यातील ही सभा लक्षवेधी ठरणार🌟


परभणी (दि.२१ एप्रिल) : परभणी लोकसभा मतदारसंघात महायुतीचे बलाढ्य उमेदवार तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ काल शनिवार दि.२० एप्रिल २०२४ रोजी परभणीत ऐतिहासिक अशी प्रचंड जाहीर सभा झाली या सभेनंतर शिवसेना (बाळासाहेब ठाकरे)-भाजप युतीचा मागील तीन/साडेतीन दशकांपासून बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या लोकसभा मतदारसंघातील वातावरण ढवळून निघाले यानंतर परभणी लोकसभा मतदारसंघातील धर्मनिरपेक्ष महाविकास आघाडीचे उमेदवार संजय उर्फ बंडू जाधव यांच्या निवडणूक प्रचारार्थ शिवसेना (उबाठा) पक्षाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची मंगळवार दि.२३ एप्रिल २०२४ रोजी परभणीत जाहीर सभा होणार असून लोकसभा निवडणूकीच्या प्रचाराच्या अंतीम टप्प्यातील उध्दव ठाकरेंची ही सभा लक्षवेधी ठरणार की मतदार संघातील सुजाण मतदारांकडून दुर्लक्षीत होणार हे तर निवडणूक निकालानंतरच कळणार आहे.

               दरम्यान परभणी जिल्ह्यातील लोकसभा निवडणूक असो की विधानसभा निवडणूका निवडणूकांच्या रणधुमाळीच्या अंतीम टप्प्यात या जिल्ह्यातील भुतकाळ पाहता असे निदर्शनास येते की प्रत्येक निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात ठाकरे कुटूंबियांची जाहीर सभा होत आल्याचे निदर्शनास येते प्रखर हिंदुत्ववादी विचारांची धगधगती तोफ म्हणून इतिहासात ज्यांची नोंद झाली असे स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे देखील प्रत्येक निवडणूकीत प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात मतदानाच्या दोन दिवस आधी परभणीत आवर्जून सभा घेऊन जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीला कलाटणी देण्याचे काम करीत शिवसेना प्रमुख ठाकरे यांची प्रत्येक सभा निर्णायकही ठरत असे त्यांच्यानंतर शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी देखील ही मालिका कायम राखली या जिल्हास्थानी प्रत्येक निवडणुकीच्या रणधुमाळीच्या समारोपाप्रसंगी जंगी सभा घेतल्या. विशेष म्हणजे या सभांचे स्टेडिअम मैदान हेच स्थळ राहिले आहे. या लोकसभा निवडणूकीतसुध्दा बदललेल्या राजकीय समीकरणांच्या पार्श्‍वभूमीवर उध्दव ठाकरे यांची मंगळवार दि.२३ एप्रिल रोजी सायंकाळी ०६-०० वाजता होणाऱ्या या सभेस महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष नाना पटोले शिवसेना (उबाठा) चे नेते मिलींद नार्वेकर हे दोघे आवर्जून उपस्थित राहणार आहेत. 

              दरम्यान, या लक्षवेधी सभेस अधिकाधिक नागरीकांनी उपस्थित रहावे, या दृष्टीकोनातून शिवसेनेच्या नेतेमंडळींनी भक्कम अशी तयारी सुरु केली आहे जाधव यांच्यासह महाविकास आघाडीतील नेतेमंडळींनी या दृष्टीने बैठकांचे सत्र व मोर्चेबांधणी सुरु केली आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या