🌟हिंगोली येथील युवा शेतकऱ्याला टरबूज विक्रीतून लाखोंचा नफा.....!


🌟एक एक्कर शेतातील टरबूजातून अवघ्या 70 दिवसात एक लाख 75 हजार  रुपयांचे काढले उत्पादन🌟 


शिवशंकर निरगुडे (हिंगोली)

हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव  तालुक्यातील हिवरखेडा येथील एका शेतकऱ्याने एक  एकरात लागवड केलेल्या टरबूज विक्रीतून 70 दिवसांत  1लाख 75 हजार रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. यातून 35 हजार रुपये खर्च वजा जाता. शेतकऱ्याला एक  लाख 35 हजार रुपये निव्वळ नफा झाला त्यांनी पहिल्यांदाच टरबुजाची लागवड केली होती. हिवरखेडा शेतकरी रामदास ईरतकर  यांनी एका एकर टरबूजातून अवघ्या 70 दिवसात एक लाख 75 हजार  रुपयाचे उत्पादन काढले आहे. 

हिवरखेडा हा भाग दुष्काळी पट्टा आहे गावाच्या बाजूला येलदरी धरण आहे मात्र या धरानाच्या पाण्याचा शेतकऱ्यांना काहीच फायदा नाही धरण ऊशाला आणि कोरड घश्याला अशी परिस्थिती आहे या सर्व परिस्थितीवर मात्र करत ईरतकर यांनी त्याच्या शेतात  नानाजी देशमुख योजनेतून शेततळे केले व ते हिवाळ्यात त्याच्या शेतातील विहिरीवरुन त्या शेततळ्यात पाईपलाईन आणून ते पूर्ण पणे भरून टाकले व आत्ता त्या पाण्यावर त्यांनी टरबूज पिक घेतले आहे  

पारंपरिक पिकाला फाटा देत रामदास ईरतकर व त्याची दोन मुले सुभाष ईरतकर हें कृषी मध्ये काम करतात व विठ्ठल ईरतकर व त्याचे वडील हें शेतातील कामे पाहतात यांनी आपल्या एका एकर क्षेत्रावर ट्रॅक्टरच्याव सहाय्याने खोल नांगरटी व रोटरी करून घेतली. त्या एका  एकर क्षेत्रात टरबूज पिकांची लागवड करण्यासाठी सहा फुटावर बेड मारून घेतले त्यानंतर रासायनिक खताचा डोज मिक्स करून टाकून घेतला पिकाला पाणी देण्यासाठी ठिबकसिंचनचे नियोजन केले व त्यावर मल्चीग टाकून झिगजेग पद्धतीने सव्वा फुटावर पाच हजार रोपांची लागवड जानेवारी  महीन्यात केली होती

पिकाला पाणी व खताचे सूक्ष्म नियोजन केले. पिकाच्या वाढीनुसार वेगवेगळी विद्राव्य खते ठिबकद्वारे पोटॅशियम शोनाइटसह दिली. विविध बुरशीनाशकांचा वापर केला. पिकावर रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून आलटून पालटून वेगवेगळ्या रासायनिक औषधांचा फवारणी घेतल्या. रोपांची शेतात लागवड केल्यानंतर  65 ते 70 दिवसच देखरेख करावी लागली . टरबूज पिकाची.काढणी केली असता एका  एकर क्षेत्रातून 15 टन  टरबूजचा माल निघला होता आहे 

* 70 दिवसात शेतकऱ्याला 1लाख 35 हजार  निव्वळ नफा :-

नानाजी देशमुख योजनेतून मी  शेतात शेततळे घेऊन मी माझ्या एकर क्षेत्रात  टरबूज पिकाच्या लागवडीकरिता पूर्व मशागत करून पाच हजार रोपांची मल्चीण्ग टाकून शेतात लागवड केली होती आज मी माझ्या एका एकर मधून 1 लाख 75 हजार रुपयाचे उत्पादन घेतले आहे आत्ता पर्यन्त मला 35 हजार रुपये खर्च झाला आहे खर्च वजा करत मला 1 लाख 35 हजार रुपये निव्वळ नफा मिळाला आहे हा संपूर्ण माल मी डॊनगाव येथील  व्यापारी यांनी शेतात येऊन नेला आहे माझ्या शेतातील टरबुजाचे वजन 6 ते 7 किलो झाले होते  

विठ्ठल ईरतकर युवा शेतकरी हिवरखेडा  ता .सेनगाव जिल्हा हिंगोली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या