🌟परभणी येथील जिजाऊ ज्ञानतीर्थच्या तीन विद्यार्थ्यी डॉ.होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेत यशस्वी....!


🌟वैभव गिराम व स्वप्नील बोचरे या दोन विद्यार्थ्यांना सिल्वर तर श्रीनिका लोहट या विद्यार्थिनीला कांस्य पदक🌟

परभणी : मुंबई सायन्स टिसर्च असोसिएशनच्यावतीने राज्यस्तरावर डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा परीक्षा आयोजित केली जाते. या परीक्षेच्या अंतीम फेरीमध्ये येथील जिजाऊ ज्ञानतीर्थ परभणीच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी केली. जिजाऊ ज्ञानतीर्थ फौंडेशनच्या दोन विद्यार्थ्यांना सिल्वर तर एका विद्यार्थ्यांला कांस्य पदक प्राप्त करीत परभणी शहराचा लौकिक केला आहे.

सिल्वर पदक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये इयत्ता सहावीमधील  वैभव बालासाहेब गिराम, इयत्ता नववीमधील स्वप्निल पांडुरंग बोचरे यांचा समावेश आहे. तर कांस्य पदक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये इयत्ता सहावीची श्रीनिका मोहन लोहट हिचा समावेश आहे. डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेला विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयाची रुची वाढविण्यासाठी तसेच त्यांच्यातील वैज्ञानिक दृष्टिकोण प्रगल्भ करण्यासाठी महत्त्व दिले जाते. ही परीक्षा चार स्तरावर आयोजित करण्यात येते.विशेष म्हणजे परीक्षेत जिजाऊ ज्ञानतीर्थ फाऊंडेशनचे २२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते .

जिजाऊ ज्ञानतीर्थ फाऊंडेशनमध्ये करण्यात येणाऱ्या विशेष प्रयत्नांमुळे हे यश संपादित करता आल्याचे मनोगत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष रामराव लोहट, सचिव तथा मुख्याध्यापक नितीन लोहट सर कोषाध्यक्ष उषा लोहट  तसेच सर्व विभाग प्रमुख आणि शिक्षकांनी कौतुक केले आहे.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या