🌟कुणाला पाडण्यासाठी नाही तर फक्त जिंकण्यासाठी निवडणूक लढवतोय - सखाराम बोबडे पडेगावकर


🌟अशी प्रतिक्रिया शेतकरी,मेंढपाळ कष्टकऱ्यांचे प्रश्न सोडवणारे  लोकसभा उमेदवार सखाराम बोबडे यांनी व्यक्त केली🌟

गंगाखेड (दि.१६ एप्रिल) :- कुणाला पाडण्यासाठी नाही तर जिंकून येण्यासाठी निवडणूक लढवतोय अशी प्रतिक्रिया शेतकरी,मेंढपाळ कष्टकरायचे प्रश्न सोडवणारे परभणी लोकसभा उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांनी व्यक्त केली.

मागील पाच वर्षापासून परभणी लोकसभा मतदारसंघात 2024 ची निवडणूक लढवण्याची इच्छा बोलून दाखवणारे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांच्याशी आमच्या प्रतिनिधी संपर्क साधला असता ते म्हणाले की मतदारसंघात मागील पाच ते सात वर्षांपासून 2024 ची निवडणूक लढविण्याची तयारी करत आहे 2019 ची निवडणूक लढवली लढवली असता एकूण 17 उमेदवारापैकी मतानुक्रमे सहाव्या क्रमांकाची मते 6145 मध्ये मला मिळाली. हि मते गरीब कष्टकरी शेतकरी मेंढपाळ यांची होती. 2019 चा निकाल लागल्यापासूनच 2024 ची निवडणूक लढवण्याची तयारी मी केलेली आहे. तेव्हापासून दररोज मतदार संघात प्रत्येक व्यक्तीच्या कामाला धावून जाण्याच मी काम करतोय. शेतकरी, शेतमजूर, मेंढपाळ विद्यार्थी आधी सर्वांचे प्रश्न सोडवण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न करत आहे. त्यामुळे मी ऐनवेळी आलेला उमेदवार नसून मागील पाच वर्षापासून या मतदारसंघात निवडणूक लढवण्याची तयारी करत असलेला मतदार आहे .आणि मी स्वतःच्या मतदारसंघातच निवडणूक लढवत आहे. त्यामुळे मी ऐन वेळेला आलेला किंवा दुसऱ्याला कोणाला पाडण्यासाठी असलेला उमेदवार नसून केलेल्या कामाची पावती मागण्याच्या जोरावरच जिंकून येणारा उमेदवार मी आहे. मागील पाच वर्षात मी केलेल्या कामाची जाण मतदारांनी ठेवली तर येत्या निवडणुकीत किमान दोन लाखाच्या मताधिक्यांनी मी निवडून येऊ शकतो असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मतदारांनी पैसे जमा करून दिलेले आहेत. मी जनतेचा उमेदवार आहे. आचारसंहिताजाहिर झाल्यापासून संपूर्ण मतदारसंघात फिरत असताना पाच वर्षात केलेल्या कामाची पावती म्हणून भरपूर लोक गावात वेगवेगळ्या ठिकाणी आमचे उत्साहाने स्वागत करत आहेत. हे पाहता या निवडणुकीत विजय पक्का असल्याचे त्यांनी सांगितले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या