🌟यावेळी जिल्हाधिकारी श्री.गावडे यांनी उपस्थित अनुयायी यांना मतदानाची दिली शपथ🌟
परभणी (दि.14 एप्रिल) : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, उप विभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, तहसीलदार डॉ. संदिप राजपुरे, वरिष्ठ अधिष्ठाता गणेश शिंदे यांच्यासह अनुयायी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते यावेळी जिल्हाधिकारी श्री. गावडे यांनी उपस्थित अनुयायी यांना मतदानाची शपथ दिली.
* परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन :
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त आज उपजिल्हाधिकारी (रोहयो) श्रीमती संगीता चव्हाण यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
जिल्हा पुनर्वसन अधिकारी श्रीमती संतोषी देवकूळे, नायब तहसीलदार प्रशांत वाकोडकर, दत्ता गिणगिने, पठाण आबेदखान, प्रशांत हासोरीकर, दिलीप डहाळे, प्रकाश ठाकरे यांच्यासह अधिकारी -कर्मचारी उपस्थित होते.
*****
0 टिप्पण्या