🌟परभणी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक : निवडणूक निरीक्षक (सामान्य) कृष्णकुमार निराला यांची मिडिया कक्षाला भेट...!


🌟 त्यांनी मिडिया कक्षाला भेट देवून कामकाजाचा आढावा घेतला🌟


परभणी (दि.4 एप्रिल) :  लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने 17-परभणी लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निरीक्षक (सामान्य)  कृष्णकुमार निराला आणि निवडणूक निरीक्षक (पोलीस)  डॉ. विष्णुकांत यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी येथे स्थापन करण्यात आलेल्या मिडिया कक्षाला भेट देवून कामकाजाचा आढावा घेतला. 



यावेळी श्री.कृष्णकुमार निराला यांनी माध्यम कक्षाला भेट दिली असता, माध्यम कक्षाद्वारे राजकीय, जाहिरातीचे प्रमाणीकरण, उमेदवारांच्या निवडणूक खर्चाच्या दृष्टीकोनातून मुद्रीत व इलेक्ट्रॉनिक्स जाहिरातीवर लक्ष ठेवणे, मुद्रित माध्यमे, इलेक्ट्रॉनिक माध्यमे तसेच सोशल माध्यमांवर प्रसारित होणाऱ्या जाहिराती, बातम्या, पोस्ट पेड न्यूज आहेत का यावर लक्ष ठेवणे, निवडणूक आचारसंहिता कालावधीत मुद्रीत व इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये प्रसिध्द होणारे वृत्त जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या निदर्शनास आणून देणे, उमेदवारांचा दैनंदिन निवडणूक जाहिरातींचा खर्च अहवाल, माध्यमांना निवडणुक विषयक वृत्ताकंन पाठविणे, पत्रकार परिषदांचे आयोजन करणे, निवडणूकीच्या अनुषंगाने वृत्तपत्रात प्रसिध्द होणारे वृत्त व जाहिरातीवर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आवश्यक ती कार्यवाही करणे, निवडणूक विषयक महत्वाच्या बातम्याबाबतचा दैनंदिन मिडिया मॉनिटरींग अहवाल राज्य निवडणूक आयोगाला सादर करणे. माध्यम प्रमाणीकरण आणि सनियंत्रण समितीकडे येणारे राजकीय जाहिरातींचे प्रमाणीकरण करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी यांनी यावेळी दिली माध्यम कक्षाने राजकीय पक्ष आणि उमेदवारांच्या निवडणूक जाहिरातींवर तसेच संशयीत पेडन्यूजवर काळजीपूर्वक लक्ष ठेवण्याचे निर्देश निवडणूक निरीक्षक श्री. निराला यांनी यावेळी दिले. 

यावेळी उप जिल्हा निवडणूक अधिकारी जनार्धन विधाते, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, मिडिया कक्षाचे पथक प्रमुख तथा जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी, मिडिया कक्षातील उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जाधव, विभागीय वन अधिकारी राजेंद्र नाले, सहायक पोलीस निरक्षक विकास कोकाटे, कपिल पेंडलवार, वामनकुमार वाणी, शिवाजी गमे, गजानन शिंदे, संतोष काळे, बी.टी.लिंगायत, अमृत सोनवणे, हिना सय्यद यांची उपस्थिती होती......

****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या