🌟परभणी जिल्ह्यातील पुर्णा तालुक्यातल्या हाटकरवाडी शिवारात भरधाव वेगाने निघालेला कंटेनर झाला पलटी....!


🌟या अपघातात सुदैवाने कोणतीही जिवित हानी झाली नसली तरी कंटेनरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले🌟 

परभणी (दि.११ एप्रिल) : परभणी जिल्ह्यातील पुर्णा तालुक्यातून जाणार्‍या राज्य महामार्ग क्र.६१ सिंगणापूर-नांदेड या मार्गावर हाटकरवाडी शिवारात भरधाव वेगाने निघालेला कंटेनर क्रमांक एम.एस.४६ एआर ६९२० हा कंटेनर आज गुरुवार दि.११ एप्रिल २०२४ रोजी सकाळच्या सुमारास पलटी झाल्याची घटना घडली सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीत हानी झाली नसली तरी अपघातग्रस्त कंटेनरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

       सदरील कंटेनर क्रमांक एम.एम.४६ एआर.६९२० हा कंटेनर ताडकळसहून पूर्णेच्या दिशेने भरधाव वेगाने निघाला होता सदरील कंटेनरच्या चालकाचे नियंत्रण सुटले त्यामुळे कंटेनर उलटला. सुदैवाने यात कोणतीही जिवीत हानी झाली नाही.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या