🌟परभणी लोकसभा निवडणूक : आश्वासनांची खैरात वाटण्याचा शेवटचा दिवस अखेर उलटला : आता प्रत्यक्ष भेटीगाठींवर भर...!


🌟प्रचाराची कर्णकर्कश रणधुमाळी अखेर आज बुधवारी सायंकाळी थांबली🌟 

परभणी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रीय व राज्यस्तरीय मान्यताप्राप्त विविध राजकीय पक्षांच्या एकूण १३ उमेदवारांसह तब्बल २१ अपक्ष उमेदवार निवडणूक मैदानात उतरले असून या लोकसभा निवडणुकीत एकूण ३४ उमेदवारांनी उमेदवारी दाखल केली होती यातील दोन अपक्ष उमेदवारांनी महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांना बिनशर्त पाठिंबा दिल्याची घोषणा केल्यामुळे आता ३२ उमेदवारांच्या भविष्यावर दि.२६ एप्रिल २०२४ रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेतून मतदार शिक्कामोर्तब करुन आपल्या मताधिकाराचा वापर करीत आपला प्रतिनिधी निवडून लोकसभेत पाठवणार आहेत.

परभणी लोकसभा मतदारसंघातील प्रचाराचा आज बुधवार दि.२४ एप्रिल २०२४ रोजी शेवटचा दिवस होता त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या उमेदवारांकडून आश्वासनाची खैरात वाटण्याचा देखील आज शेवटचा दिवस अखेर उलटल्याने आता प्रत्येक उमेदवार उरलेल्या उद्याच्या एक दिवस प्रत्येक उमेदवार व त्यांचे समर्थक कार्यकर्ते मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीगाठींवर भर देण्याचा प्रयत्न करणार यात तिळमात्र शंका नाही दरम्यान या लोकसभा निवडणुकीत बहुजन समाज पार्टीकडून आलमगीर खान, शिवसेना (उबाठा)-राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष-भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या संयुक्त महाविकास आघाडीकडून खा.संजय उर्फ बंडू जाधव तर भारतीय जनता पक्ष-शिवसेना (शिंदे) पक्ष-राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार) पार्टी-रिपाइं (आठवले)-राष्ट्रीय समाज पक्षाच्या संयुक्त महायुतीकडून महादेव जानकर, वंचित बहुजन आघाडीकडून पंजाबराव डख, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाकडून कॉ.राजन क्षिरसागर, बहुजन भारत पार्टी कडून डॉ.गोवर्धन खंडागळे, बळीराजा पार्टी कडून कैलास पवार (नाईक), महाराष्ट्र विकास आघाडी कडून दशरथ राठोड, बहुजन मुक्ती पार्टी कडून ॲड.विनोद अंबोरे,ऑल इंडिया मजलीस-ए-इन्कीलाब-ए-मिल्लत कडून शेख सलीम शेख इब्राहिम,सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया कडून सय्यद इरशाद अली सय्यद लायख अली, स्वराज्य शक्ती सेनेकडून संगिता व्यंकटराव गिरी,जय सेवालाल बहुजन विकास पार्टीकडून श्रीराम जाधव आदी राष्ट्रीय व राज्यस्तरीय मान्यताप्राप्त विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह अपक्ष उमेदवार अनिल माणिकराव मुदगलकर,अर्जुन भिसे, आप्पासाहेब ओंकार कदम,कांबळे शिवाजी देवजी,कारभारी कुंडलीक मिठे,किशोर राधाकिशन ढगे,किशोरकुमार प्रकाश शिंदे,कृष्णा त्र्यंबकराव पवार,कॉम्रेड गणपत भिसे,गोविंदभैया रामराव देशमुख,बोबडे सखाराम पडेगावकर,मुस्तफा मैनुद्दीन शेख,राजाभाऊ शेषराव काकडे,राजेंद्र रामदास अटकळ,विजय अण्णासाहेब ठोंबरे,प्रा.डॉ.विलास बन्शीधर तांगडे,विष्णूदास शिवाजी भोसले,समीर गणेशराव दुधगावकर,सय्यद अब्दुल्ल सत्तार अजीज,सुभाष दत्तराव जावळे,ज्ञानेश्वर जगन्नाथ दहीभाते आदी २१ अपक्ष उमेदवारांचा समावेश असून यातील सखाराम बोबडे पडेगाव व अनिल माणिकराव मुदगलकर या दोन अपक्ष उमेदवारांनी महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांना बिनशर्त पाठिंबा दिल्याची घोषणा केली आहे.

परभणी लोकसभा मतदारसंघात एकून २१ लाख २३ हजार ०५६ मतदारांचा समावेश असून यात ११०३८९१ पुरुष मतदार तर १०१९१३२ महिला मतदारांसह ३३ तृतीय पंथीय मतदारांचा समावेश असून पोस्टल मतदार एकूण ४९८८९ आहेत आज बुधवार दि.२४ एप्रिल रोजी प्रचाराचा शेवटचा दिवस होता त्यामुळे सायंकाळी ०६-०० वाजेपासून प्रचाराची कर्णकर्कश रणधुमाळी थांबली असून दि.२६ एप्रिल २०२४ रोजी मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार असल्याने परभणी जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी सज्ज झाली आहे.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या