🌟पुर्णा तालुक्यातील बलसा येथील छावा संघटनेचे मा.उपतालुका प्रमुख नामदेव डूबे यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश...!


🌟या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे नेते सुरेशराव फड यांनी त्यांचे पुष्पहार अर्पण करून स्वागत केले🌟

पुर्णा : पूर्णा येथे वंचित बहुजन आघाडीचे नेते सुरेशराव फड यांनी शुक्रवार दि.०५ एप्रिल २०२४ रोजी  सदिच्छा भेट दिली असता तालुक्यातील छावा संघटनेचे उपतालुका प्रमुख नामदेव डुबे यांनी वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश घेतला. 

या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे नेते सुरेशराव फड यांनी त्यांचे पुष्पहार अर्पण करून स्वागत केले. या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा पदाधिकारी मनोहर वाव्हळे, रवी वाघमारे,ॲड. हिरानंद गायकवाड तालुका अध्यक्ष श्यामभाऊ काळे,भारतीय बौध्द महासभेचे तालुका अध्यक्ष सुनील मगरे सामाजिक कार्यकर्ते लिंबाजी खंदारे समता सैनिक दलाचे राजाराम गायकवाड,आनंद गायकवाड असे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या