🌟परभणीत लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीची ०६ एप्रिल रोजी लोकसभा नियोजन बैठक संपन्न....!


🌟जिल्ह्यात उद्योग क्षेत्राचा कुठलाही विकास न झाल्याने बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढली आहे - युवा जिल्हाध्यक्ष तुषार गायकवाड 


परभणी : परभणीत लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीची काल शनिवार ०६ एप्रिल २०२४ रोजी लोकसभा नियोजन बैठक संपन्न झाली या बैठकीस वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष नागोरावजी पांचाळ,विभागीय उपाध्यक्ष दिपकजी ढोके,मराठवाडा विभागीय प्रवक्ते डॉ.धर्मराज चव्हाण,विभागीय प्रशिक्षक डॉ.प्रा.सुरेशची शेळके,ओबीसी नेते सुरेश फड परभणी,महिला जिल्हा अध्यक्ष सुनीता ताई साळवे परभणी,युवा जिल्हाध्यक्ष तुषार गायकवाड परभणी (दक्षिण.),युवा जिल्हाध्यक्ष सुमित भालेराव (उत्तर) परभणी,जिल्हा अध्यक्ष अशोक कांबळे भारतीय बौद्ध महासभा परभणी आदींची प्रमुख उपस्थिती होती.


यावेळी बैठकीत उपस्थित उपस्थितांना मार्गदर्शन करतांना वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष तुषार गायकवाड म्हणाले की समाजातील सोशित वंचित शेतकरी शेतमजूर रोजमजूरांसह सर्वसामान्य जनता व युवकांच्या वेदना जाणून घेणारा एकमेव पक्ष म्हणजे वंचित बहुजन आघाडी आहे संपूर्ण जिल्ह्यात उद्योग क्षेत्राचा कुठलाही विकास न झाल्याने बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढली आहे रोजगाराचे कुठलेही साधन उपलब्ध नाही परभणी जिल्हा बेरोजगार मुक्त करायचा आहे त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार पंजाबराव डक यांनाच प्रचंड मतांनी निवडून द्या असे आवाहन यावेळी त्यांनी केले.

वंचित बहुजन आघाडीच्या या लोकसभा नियोजन बैठकीस ओबीसी नेते प्रा अमोल मामा ढाकणे परभणी, जेष्ठ नेते डिगांबर घोबाळे गंगाखेड,जेष्ठ नेते रवी वाघमारे परभणी,युवा आग नेते रामेश्वर पंडित सोनपेठ,युवा नेते रामेश्वर पंडित सोनपेठ,युवा नेते धम्मदीप साळवे परभणी आदींसह युवा जिल्हा महासचिव अवडाजी ढवळे परभणी,युवा जिल्हा उपाध्याक्ष दिलीप मोरे परभणी,युवा जिल्हा उपाध्यक्ष गणेश गाडे परभणी,युवा जिल्हा महासचिव सतीश वाकळे परभणी,शहर अध्यक्ष प्रमोद कुटे परभणी,युवा तालूका अध्यक्ष बाळासाहेब वाघमारे सोनपेठ,युवा तालुका अध्यक्ष फेरोज पठाण  पुर्णा,युवा तालुका अध्यक्ष मंगेश धनसडे पालम,युवा तालुका अध्यक्ष अनंता कांबळे पाथरी,युवा तालुका अध्यक्ष श्रीकांत कदम गंगाखेड,युवा तालुका अध्यक्ष ॲड भूषण दवंडे मानवत आदींसह कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी प्रचंड संख्येने उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या