🌟परभणी लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडीकडून पंजाबराव डख यांना उमेदवारी.....!


🌟बाळासाहेब उगले ऐवजी अचानक डख यांच्या नावाची घोषणा करीत वंचित बहुजन आघाडीने संपूर्ण जिल्ह्याला दिला सुखद धक्का🌟


(
परभणी लोकसभा मतदारसंघातील बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार पंजाबराव डक पाटील यांचा अर्ज भरल्यानंतर स्वागत करताना मराठवाडा अध्यक्ष अशोकरावजी हिगे,शिवा पाटील,तुषार गायकवाड,माणिकराव सूर्यवंशी पाटील आदी)

परभणी (दि.०४ एप्रिल) :  परभणी लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीने हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांना उमेदवारी जाहीर करीत राजकीय वर्तूळात अक्षरशः खळबळ माजवली असून तत्पूर्वी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बाळासाहेब उगले यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती परंतु अचानक पंजाबराव डख यांच्या नावाची घोषणा करीत वंचित बहुजन आघाडीने संपूर्ण जिल्ह्याला सुखद धक्का दिला असून पंजाबराव डंख शेतकरी मित्र व भुमीपुत्र असल्याने या लोकसभा निवडणुकीत जिल्ह्याचे राजकीय चित्र काही वेगळे राहणार आहे.

            या मतदारसंघातून घनसावंती तालुक्यातील बाळासाहेब उगले यांना वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे ते उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरीता तयारीत होते. असे असतांनाच गुरुवारी (दि.04) सकाळी ज्येष्ठ नेते प्रकाश आंबेडकर यांनी उगले यांच्याऐवजी हवामानतज्ञ पंजाबराव डख यांना उमेदवारी द्यावयाचा निर्णय घेतला. पाठोपाठ श्रेष्ठींनी डख यांना एबी फॉर्मसुध्दा उपलब्ध केला. त्यामुळे डख यांनी गुरुवारी मोठ्या लगबगीने सर्व सहकार्‍यांसह जिल्हाधिकारी कार्यालय गाठून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या