🌟परभणी लोकसभेसाठी पुर्णा तालुक्यातील ताडकळस मध्ये ६२.५६ % मतदान.....!


🌟कुठलेही गालबोट न लागता सायंकाळी ०७-१३ वाजेपर्यंत शेवटच्या मतदाराने हक्क बजावला🌟

परभणी लोकसभेसाठी पुर्णा तालुक्यातील ताडकळस येथे काल शुक्रवार दि.२६ एप्रिल २०२४ रोजी सकाळ पासूनच मतदारांनी मतदानासाठी रांगा लागल्या होत्या भारतीय लोक तंत्रामधील सर्वात मोठा उत्सव म्हणजे मतदान दिन भारतीय लोकशाहीला मजबूत करण्यासाठी ताडकळस येथील ६२५१ मतदारांपैकी ३९११ मतदारांनी मतदान करून आपला मतदानाचा हक्क कुठलेही गालबोट न लागता सायंकाळी ०७-१३ वाजेपर्यंत शेवटच्या मतदाराने हक्क बजावला.

     ताडकळस येथील वार्ड क्र.०१ मध्ये एकूण १२९९ मतदारांपैकी ७८६ मतदान झाले त्यात ३६३ महिला तर ४२३ पुरुष मतदारांचा समावेश होता तर वार्ड क्र.०२ मध्ये १२११ मतदारापैकी ८१७  मतदान झाले. वार्ड क्र.०३ मध्ये १२५५ पैकी ७५९ मतदारांनी आपला हक्क बजावला त्यापैकी ३४४ महिला तर ४१५ पुरुष मतदारांचा समावेश होता तर वार्ड क्र.०४ मध्ये १२१५ एकूण मतदान आहे त्यापैकी ७४५ मतदान झाले यात ३३५ महिला तर ४१० पुरुषांनी मतदानाचा हक्क बजावला तर वार्ड क्र.०५ मध्ये १२७१ एकूण मतदान आहे त्यापैकी ८०४ मतदान झाले त्यात ३७३ महिला तर ४३१ पुरुषांनी मतदानाचा हक्क बजावला.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या