🌟पक्षाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादीचे पदाधिकारी भिडले शेतकऱ्यांचे कैवारी रविकांत तुपकरांच्या प्रचाराला.......!


🌟पक्षबाजुला ठेऊन शेतकरीपुत्र या नात्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे विनायक पाटलांचा रविकांत तुपकरांना पाठीबा🌟

✍️ मोहन चौकेकर

बुलढाणा  :: यावेळीची लढाई ही सर्वसामान्य जनतेची लढाई आहे. जनशक्ती विरुद्ध धनशक्तीचा हा लढा यशस्वी करण्यासाठी जात- पात- धर्म, पक्ष बाजूला ठेवून एकत्र या, असे आवाहन रविकांत तुपकर यांनी केले आहे. या आवाहनाला जिल्हाभरातून प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. पक्ष आणि पद बाजूला ठेवून विविध पक्षाचे पदाधिकारी रविकांत तुपकर यांच्या प्रचाराला आता उघडपणे फिरत आहेत. राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस विनायक पाटील यांनी आधी मी शेतकरी आणि नंतर पक्षाचा पदाधिकारी आहे असे म्हणत, पक्षाचा राजीनामा देऊन रविकांत तुपकर यांना पाठिंबा जाहीर केला असून प्रत्यक्ष प्रचाराला देखील ते सुरू झाले आहेत.

 

    रविकांत तुपकर हे शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य जनता, तरुण, वंचित घटकाचे अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभेच्या रिंगणात आहेत. सर्व समाजातून आणि समाजातील सर्व घटकातून त्यांना उत्स्फूर्त असा प्रतिसादाने पाठिंबा मिळत असल्याचे चित्र जिल्हाभर दिसून येत आहे. गेल्या २२ वर्षात  केलेल्या कामाची मजुरी म्हणून एक मत द्या, अशी साध रविकांत तुपकर घालत आहेत. पक्षाचे झेंडे बाजूला ठेवा आणि शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य म्हणून एकत्र या, असे आवाहन देखील रविकांत तुपकर यांनी केले आहे. त्यांच्या या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे. आपला पक्ष बाजूला ठेवून विविध पक्षातील अनेक पदाधिकारी रविकांत तुपकर यांच्या सोबत उघडपणे काम करतांना दिसत आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हा सरचिटणीस विनायक पाटील यांनी देखील रविकांत तुपकरांना आपला पाठींबा जाहीर केला असून उघडपणे प्रचार देखील करत आहे. आधी मी एक शेतकरी पुत्र आहे आणि नंतर पक्षाचा पदाधिकारी आहे, असे म्हणत रविकांत तुपकर यांना पाठींबा दिला आहे. तसा व्हीडीओ त्यांनी सोशल मीडियावर अपलोड केला आहे. शेतकरी पुत्र व सर्वसामान्यांचा उमेदवार या भावनेतून त्यांनी स्वत:चा व्हीडीओ प्रसारीत करुन रविकांत तुपकरांना पाठींबा देत आहे. माझ्या या निर्णयामुळे आपल्या पक्षाला कुठली अडचण येऊ नये म्हणून पक्षाच्या पदाचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे, असे विनायक पाटील यांनी त्यांच्या राजीनाम्यात नमुद केले आहे. आपणही सर्वसामान्यांचे उमेदवार असलेले रविकांत तुपकर यांना मतदान करावे, अशी टीपही त्यांनी राजीनाम्यात नमुद केली आहे. पक्षाचा राजीनामा देऊन ते रविकांत तुपकर यांच्या प्रचाराला देखील सुरु झाले आहेत. विनायक पाटील यांच्याप्रमाणेच पक्षाचे झेंडे बाजुला ठेवुन शेतकरी म्हणून अनेक पदाधिकारी एकत्र येत आहेत. रविकांत तुपकर यांची लाट बनली आहे. त्यामुळे आता विविध पक्षाचे पदाधिकारी देखील रविकांत तुपकर यांचा उघडपणे प्रचार करतांना दिसून येणार आहेत अशी चर्चा विविध ठिकाणी सुरू असल्याचे दिसून येत आहे...... 

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या