🌟हिंगोली जिल्ह्यातल्या आखाडा बाळापूर पोलीस स्थानकाच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेची धाडसी कारवाई....!


🌟अवैध गांजा बाळगून विक्री करणाऱ्यावर धाड ३३ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त🌟 

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर पोलीस स्थानकाच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाडसी कारवाई करीत अवैधरित्या गांजा बाळगुन विक्री करणाऱ्यावर धाड टाकून तब्बल ३३ हजार ७५० रुपयांचा अवैधरित्या बाळगलेला गांजा जप्त केला या कारवाईत हिंगोली जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आखाडा बाळापूर पोलीस स्थानकात ०१ इसमाविरुध्द एनडीपीएस कायदा अन्वये गुन्हा दाखल केला असल्याचे समजते.

हिंगोली जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हा पोलिस अधिक्षक जी.श्रीधर यांनी हिंगोली जिल्ह्यातील अवैद्य धंद्याविरुध्द व शासनाने प्रतिबंधीत केलेला गांजा विक्री विरुध्द प्रभावी कार्यवाही करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विकास पाटील यांना दिले होते.....

 ✍🏻धन्यवाद साभार : पत्रकार मोईम कादरी हिंगोली 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या