🌟परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील युवतीच्या आत्महत्या प्रकरणी विविध सामाजिक संघटना संतप्त....!


🌟उद्या रविवार दि.28 एप्रिल रोजी महसूल व पोलिस प्रशासनाकडे निषेध नोंदविण्याचा संकल्प🌟

परभणी (दि.27 एप्रिल) : परभणी जिल्ह्यातील गंगाखेड शहरातल्या संत जनाबाई नगरातील 19 वर्षीय युवतीस अश्‍लिल व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देवून आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या निषेधार्थ गंगाखेड येथील विविध सामाजिक संघटनांनी उद्या रविवार दि.28 एप्रिल 2024 रोजी महसूल व पोलिस प्रशासनाकडे निषेध नोंदविण्याचा संकल्प केला आहे.

             जनाबाई नगरातील एका 19 वर्षीय युवतीस सचिन हजारे नामक युवकाने तुझे अश्‍लिल फोटो माझ्याकडे आहेत ते जर सोशल मिडीयावर व्हायरल करायचे नसतील तर दोन लाख रुपये दे असे नमूद करीत धमकावले मुलीसह पालकांनी आपल्याकडे पैसे नाहीत, तू व्हिडीओ असेल तर डिलीट कर, असे म्हटले, तेव्हा सचिन हजारे व त्याची पत्नी या दोघांनी या कुटूंबियांना शिवीगाळ केली. या प्रकाराने संबंधित युवतीने सर्व कुटूंबिय झोपेत असतांना गुरुवारी पहाटे गळफास घेवून आत्महत्या केली. या प्रकरणात संबंधित युवतीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे प्रथम आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली परंतु पित्यासह अन्य नातेवाईकांनी कठोर भूमिका घेतल्यानंतर तीन आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला व सचिन हजारे व त्यांच्या पत्नीला पोलिसांनी अटक केली.

            दरम्यान, या प्रकरणात गंगाखेडातील महिला दक्षता समिती,सवंगडी कट्टा सामाजिक समूह,व्यापारी महासंघ,लायन्स क्लब गोल्ड सिटी, लायन्स क्लब टाऊन, साई सेवा प्रतिष्ठान, लोक जनशक्ती, संघर्ष प्रतिष्ठान,गोदावरी स्वच्छता अभियान, पतंजली योग समिती, डीकेसी ट्रस्ट,नाभिक महामंडळ, रक्षक फाऊंडेशन, रुद्राक्ष मित्र मंडळ, स्वामी विवेकानंद मित्र मंडळ, मन्मथ सेवा ट्रस्ट, गंगाखेड तालुका पत्रकार संघ आदी संघटनांच्या वतीने रविवारी सकाळी भगवती चौकात जमून पोलिस व महसूल प्रशासनास निवेदन द्यावयाचा संकल्प सोडला आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या