🌟दिव्यांग जोडप्याच्या अश्रूला आनंदात बदलले रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी रंजन तेलंग यांची मर्मस्पर्शी कामगिरी.....!


🌟अन् रंजन तेलंग यांच्या कामगिरी ने स्टेशन वरील यात्रेकरू सुद्धा अक्षरशः भावुक झाले🌟

अकोला : बुलढाणा जिल्ह्यातील श्रीक्षेत्र शेगाव येथील रेल्वे स्थानकावर गुरुवार दि.०४ एप्रिल २०२४ रोजी एक दिव्यांग जोडपे आले होते त्यांच्या जवळच बसलेल्या एका दुसऱ्या दिव्यांग व्यक्तीने त्यांची बैग चुकीने आपल्या सोबत घेऊन गेला आयुष्य भराचे महत्वपूर्ण कागदपत्रे ०३ मोबाईल व १०००/- रुपयें रोख गेल्याने ते दोघेही रडत असतांना रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी रंजन तेलंग यांच्या नजरेत आले.

यावेळी श्री.तेलंग यांनी विचारपूस केली असता वरील हकीकत त्यांना माहिती पडली, तेलंग यांनी लगेच सीसीटीव्ही च्या माध्यमातून बैग नेणारा हेरला व तो ज्या ट्रेन मध्ये बसला ती ट्रेन बडनेरा येथील सहायक उप निरीक्षक भाऊ साहेब पवार यांना माहीती देऊन त्याच्या जवळून बैग ताब्यात घेतली व लगेच शेगाव ला परत पाठवली ,रंजन तेलंग यांनी बैग मिळाल्याचे सांगताच दोघे ही आनंदाने भारावून गेले व वरील सर्व मुद्देमाल सह तेलंग यांनी कायदेशीर कारवाई करत आज दिनांक 05 एप्रिल रोजी बैग त्यांना परत केली रंजन तेलंग यांच्या कामगिरी ने स्टेशन वरील यात्रेकरू सुद्धा भावुक झाले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या