🌟परभणी लोकसभा निवडणूक : मतदान करतेवेळी एकूण १२ पुरावे ग्राह्य धरले जाणार....!


🌟मतदानाच्या वेळेस येतांना मतदारांनी मतदार ओळखपत्र सोबत ठेवावे🌟 

परभणी (दि.२५ एप्रिल) :  लोकसभा निवडणूकीच्या मतदानाच्या ०२ टप्प्यात निवडणूक आयोगाने मतदान ओळखपत्रासह इतर ११ पुरावे ग्राह्य धरले आहेत.

             परभणी लोकसभा मतदारसंघांतर्गत उद्या शुक्रवार दि.२६ एप्रिल २०२४ रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार असून मतदानाच्या वेळेस येतांना मतदारांनी मतदार ओळखपत्र सोबत ठेवावे अन्यथा आधार कार्ड,पॅनकार्ड,दिव्यांग व्यक्ती ओळखपत्र,कामगार आरोग्य विमा स्मार्ट कार्ड,वाहनचालक परवाना,पासपोर्ट,निवृत्तीवेतन दस्तऐवज,मनरेगा रोजगार ओळखपत्र,शासन सार्वजनिक उपक्रम तसेच पब्लिक लिमिटेड कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना वितरीत छायाचित्र असलेले सेवा ओळखपत्र, बँक किंवा टपाल विभागाचे छायाचित्र असलेले पासबुक, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही, स्मार्ट कार्ड, संसद विधानसभा,विधानपरिषदेच्या सदस्यांना वितरीत केलेले अधिकृत ओळखपत्र ग्राह्य धरले जाणार आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या