🌟परभणी जिल्ह्याच्या हक्काची रेल्वे व्हॅगन फॅक्टरी लातूरला : कुचकामी नेतृत्व कारणीभूत....!


🌟महायुतीचे उमेदवार महादेवराव जानकर यांचा गंभीर आरोप🌟


परभणी : परभणी जिल्ह्यातील पुर्णा रेल्वे जंक्शनच्या हक्काचा वंदे भारत रेल्वेचा व्हॅगन फॅक्टरीचा कारखाना परभणी जिल्ह्यात उभारला जाणार होता दुर्देवाने या जिल्ह्यातील कुचकामी नेतृत्वामुळेच तो कारखाना लातूरच्या नेतेमंडळींनी पळविला असा गंभीर आरोप महायुतीचे उमेदवार तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेवराव जानकर यांनी केला.

            आपल्या निवडणूक प्रचारार्थ जानकर यांनी गुरुवार दि.१८ एप्रिल रोजी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मतदारांशी संपर्क संवाद साधला. त्यावेळी जानकर यांनी या संदर्भातील गौप्यस्फोट केला. परभणी जिल्ह्यात रेल्वेचे मोठे जाळे आहे. रेल्वेच्या मालकीची मोठी जमीनसुध्दा आहे दुर्देवाने या जमीनीवर रेल्वेने एकदा नव्हे दोनदा रेल्वे डब्बे बनविण्याचा कारखाने आणण्याचा प्रयत्न केला होता. परंतु या जिल्ह्यातील निष्क्रिय आणि उदासिन नेतृत्वामुळेच दोन्ही वेळा ते कारखाने अन्य जिल्ह्यांनी पळविले. अलिकडील वंदे भारत रेल्वेचा व्हॅगन फॅक्टरीचा कारखानाही परभणी जिल्ह्यात होणार होता. परंतु लातूर जिल्ह्यातील सक्षम नेतृत्वाने तो कारखाना आपल्या जिल्ह्यात ओढून नेला मात्र या गोष्टीची या जिल्ह्यातील नेतृत्वास कधी खंतही वाटली नाही किंवा कधी खेदही व्यक्त केला नाही.

या जिल्ह्यात सातत्याने वर्षानूवर्ष काही पक्षांनी प्रस्थापितांनी सत्ता राखली. दुर्देवाने जिल्हावासीयांच्या पदरात काही पडले नाही. वास्तविकतः या काळ्या आणि सुपीक मातीच्या जिल्ह्यात कृषीपुरक उद्योग प्रप्रक्रिया उद्योग मोठ्या प्रमाणावर उभारले गेले असते. येथून मुंबई, हैद्राबाद किंवा अन्यत्रही उत्पादने पाठविता आली असती मात्र त्या दृष्टीने टिचभरही प्रयत्न झाले नाहीत.

              शिक्षण व आरोग्याच्या सुविधांबाबतही जिल्हा कोसोदूर आहे जिल्ह्यांतर्गत निष्क्रिय लोकप्रतिनिधीच त्यास कारणीभूत आहेत. विकासाच्या प्रश्‍नांबाबत जाण नाही, अभ्यासही नाही. पाठपुराव्याचा तर प्रश्‍नच उद्भवत नाही. त्यामुळेच या जिल्ह्याच्या पदरात आजपर्यंत काहीच पडले नाही. शिक्षण आणि आरोग्य तसेच अन्य पायाभूत सुविधांचा अनुशेष मोठ्या प्रमाणावर आहे. त्याची खंतही या मंडळींना वाटत नाही. त्यामुळेच सर्वसामान्य मतदारांनी या निवडणूकीतून परिवर्तनाची लाट आणावी व विकासाभिमुख महायुतीच्या मागे पाठबळ उभे करावे, असे आवाहनही जानकर यांनी केले. परभणी जिल्ह्यातील सुशिक्षीत बेरोजगारांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करुन देवू, मजूरीसह नोकरीसाठी होणारे स्थलांतर थांबवू, टाटा बिर्ला यांच्यासारख्या उद्योगपतींना निश्‍चितच साद घालू, एखादा मोठा उद्योग आणण्यावर भर देवू, त्याशिवाय पर्याय नाही, त्यामुळेच या जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासाकरीता सुज्ञ मतदारांनी दुरदृष्टी डोळ्यासमोर ठेवून विकासाभिमुख महायुतीच्या मागे भक्कम असे मताधिक्यांचे पाठबळ उभे करावे आणि परिवर्तनाचा मार्ग खूला करावा, असे आवाहनही केले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या