🌟पुर्णा तालुक्यातील वझूर येथील गोदावरी नदीपात्रात नायब तहसीलदार प्रशांत थारकर यांच्या पथकाची धाडसी कारवाई...!


🌟पथकाने गोदावरी नदीपात्रात अवैध उत्खनन करुन या चोरट्या वाळूची वाहतूक करणारे ०५ ट्रॅक्टर ट्रालीसह घेतले ताब्यात🌟


परभणी/पुर्णा (विशेष वृत्त) - परभणी जिल्ह्यात सर्वत्र तहसिल व महसूल प्रशासनातील अधिकारी/कर्मचारी लोकसभा निवडणुकीच्या कार्यक्रमात गुंतलेले असतांना नेमका यांचाच गैरफायदा घेऊन संपूर्ण जिल्ह्यासह पुर्णा तालुक्यात देखील अवैध वाळू तस्कर माफियांनी डोके वर काढण्याची बाब समोर आल्याने निवडूकीच्या काळाप्रमाणेच शासनाच्या गौण खनिज संपत्तीचे रक्षण करण्याची जवाबदारी देखील आपलीच असल्याने वेळात वेळ काढून पुर्णा तहसिलचे नायब तहसीलदार तथा महसूल पथकाचे प्रमुख प्रशांत थारकर यांनी गौण खनिज वाळू तस्करी विरोधात धडक कारवायांना सुरुवात केली असून नायब तहसीलदार थारकर व पथकातील सहकारी तलाठी श्री.अंदेलवार,कोतवाल शेखर कारले, कोतवाल मुंजाजी चव्हाण आदींनी दि.०२ एप्रिल २०२४ रोजी तालुक्यातील मौजे वझुर येथील गोदावरी नदीपात्रात धडक कारवाई करीत मोठया प्रमाणात अवैधरित्या वाळूचे उत्खनन करुन या चोरट्या वाळूची तस्करी करणारे पाच ट्रॅक्टर ट्राली वाळूसह ताब्यात घेण्याची धाडसी कारवाई केली.पुर्णा तालुक्यातील वझुर येथील गोदावरी नदीपात्रात पकडण्यात आलेल्या ०५ ट्रॅक्टरांपैकी पैकी एक ट्रॅक्टरचे चेसिस तुटल्यामुळे सदरील ट्रॅक्टर वझूर येथील पोलिस पाटील यांच्या ताब्यात देण्यात आले तर उर्वरित ०४ ट्रॅक्टर ट्रालीसह पुर्णा तहसील कार्यालयात जमा करण्यात आले असून नायब तहसीलदार तथा महसूल पथकाचे प्रमुख प्रशांत थारकर यांनी अवैध गौण खनिज वाळू तस्कर माफियांच्या विरोधात सुरू केलेल्या या धडक कारवाईत आतापर्यंत जवळपास डझनभर अवैध वाळू तस्करी करणारी वाहन ताब्यात घेऊन दंडात्मक कारवाई करत लाखो रुपयांचा महसूल वसूल करण्यात आल्याचे समजते....टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या