🌟आंतरराष्ट्रीय नृत्य दिन विशेष : नृत्यमार्गदर्शक पुस्तक : लेटर्स ऑन दी डान्स.....!


🌟आंतराराष्ट्रीय नृत्य दिवस २९ एप्रिल रोजी साजरा होतो : बॅले नृत्याचे आद्य संस्थापक जीन-जॉर्जेस नोवेर यांचा हा जन्मदिवस🌟

नृत्य हे मानवाच्या अभिव्यक्तीचा अविष्कार आहे. आपल्या शरीराच्या माध्यमातून विविध भावना व्यक्त करण्याचं ते एक माध्यम आहे. मनुष्याच्या आयुष्यात असलेल्या या नृत्याचे महत्व जगाला पटवून देण्यासाठी दरवर्षी २९ एप्रिलला आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस साजरा केला जातोय. जगभरात महान नृत्यांगना जीन-जॉर्जेस नवारेच्या वाढदिवसानिमित्त हा उत्सव साजरा करण्यात येत असतो. ज्ञानवर्धक संकलित माहिती श्रीकृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजींच्या सदर लेखातून जाणून घ्या... संपादक.


            दरवर्षी २९ एप्रिल हा दिवस आंतराराष्ट्रीय नृत्य दिवस म्हणून साजरा केला जातो. बॅले नृत्याचे आद्य संस्थापक जीन-जॉर्जेस नोवेर यांचा हा जन्मदिवस. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा दिवस पाळला जावा असे आंतरराष्ट्रीय नाट्यसंस्था- इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूशन- आइटीआइने ठरवले. ही संस्था युनेस्कोची भागीदार असलेली स्वतंत्र संस्था आहे. तिच्या आदेशावरून इ.स.१९८२ सालापासून हा दिवस साजरा करण्यात येत आहे. या दिवशी जगप्रसिद्ध आणि त्या वर्षातील सर्वोत्कृष्ट नृत्य कलावंताला जागतिक संदेश देण्यासाठी आमंत्रित केले जाते. नृत्य कलेला आणि नृत्य कलावंताला जगमान्यता मिळावी, या कलेचा उत्कर्ष आणि अधिकाधिक प्रसार व्हावा आणि तिला राजाश्रय मिळावा हा उद्देश, आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस साजरा करण्यामागे आहे. नृत्य हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून ते भावना व्यक्त करण्याचेही एक साधन आहे. मग ती एखाद्याबद्दलची नाराजी असो किंवा एखादी गोष्ट साध्य करण्याचा उत्साह आणि उत्सव असो, तुमच्या प्रत्येक भावना इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही नृत्याची मदत घेऊ शकता. इतकेच नव्हे तर नृत्याच्या माध्यमातून समाजात जनजागृती करण्याचे कामही वर्षानुवर्षे केले जात आहे.

         दि.२९ एप्रिल १९८२ रोजी युनेस्कोच्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटच्या आंतरराष्ट्रीय नृत्य समितीने महान नृत्यांगना जीन-जॉर्जेस नवेराच्या वाढदिवसानिमित्त हा दिवस साजरा करण्याची घोषणा केली होती. तेव्हापासून दरवर्षी हा दिवस जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नृत्यांगना नवेरा ही फ्रान्समधील एक निपुण बॅले डान्सर होती, जीने नृत्यावर लेटर्स ऑन दी डान्स नावाचे पुस्तक लिहिले ज्यामध्ये नृत्याशी संबंधित सर्व गोष्टी आहेत. हे वाचून कोणीही नृत्य शिकू शकेल. आंतरराष्ट्रीय नृत्य दिनाचे उद्दिष्ट केवळ जगातील सर्व नर्तकांचे प्रोत्साहन वाढवणे हाच नाही तर या सर्व नृत्य प्रकारांबद्दल लोकांमध्ये जागरुकता पसरवणे हा आहे, ज्यामध्ये जगातील मोठे नेते आणि सरकारे देखील सहभागी आहेत.  नृत्य हा स्वतःचा आनंद आहे आणि तो इतरांनाही वाटून घ्यायचा हाही त्याचा उद्देश आहे. पॅरिसमधील इंटरनॅशनल डान्स थिएटर इन्स्टिट्यूट दरवर्षी ऑनलाइन सेलिब्रेशनचे आयोजन करत असते. त्यावेळी आफ्रिका, आशिया, अमेरिका, युरोप आणि अरब देशांतील नृत्यनिर्मितींना आमंत्रित करण्यात येते. या उत्सवाअंतर्गत जगभरातील नृत्यातील वैविध्य आणि सौंदर्य दाखविण्याचा प्रयत्न केला जात असतो.        

           नृत्य हे केवळ एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याचाच भाग नव्हे तर काही जणांसाठी नृत्य हे स्ट्रेस बस्टर सुद्धा असते. जगात विविध प्रकारच्या संस्कृती आहेत, त्यांच्या नृत्य प्रकारावरून त्या संस्कृतीचा अंदाज बांधता येतो. नृत्य हे मानवाचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. आपल्या शरीराच्या माध्यमातून विविध प्रकारच्या भावनाना वाट करून देण्याच हे एक उत्तम माध्यम आहे. मनुष्य जीवनातील असलेले नृत्याचे महत्व जगाला पटवून देण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाट्य संस्थाने हा दिवस जगामध्ये साजरा करायला सुरुवात केली. इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूशन ही युनेस्कोची कला प्रदर्शनासाठी भागिदार संस्था आहे. जगभरातील अनेक प्रसिद्ध डान्सर्स आणि कोरियोग्राफर्स या संस्थेचे सभासद आहेत. या संस्थेने आधुनिक बेले डान्सचा निर्माता समजले जाणारे जॉर्जेस नोवेर यांना सन्मानित करण्यासाठी दरवर्षी २९ एप्रिल हा दिवस आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस म्हणून साजरा करण्याचं ठरवलं आहे. जगभर हा दिवस सर्व देशांच्या राजकीय, सामाजिक आणि भौगोलिक सीमा पार पाडून नृत्य करण्याला प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नृत्य ही एक जगातील विविध भागांना त्यांच्या नृत्य प्रकाराने जोडणारी एक भाषा आहे. त्यामुळे फक्त नृत्यकलेच्या माध्यमातून एक सकारात्मक किंवा अर्थपूर्ण संदेश देण्याचा प्रयत्न केला जातो. नृत्याचे प्रकार वेगवेगळे आहेत. अगदी लहान लहान प्रदेशापासून वेगवेगळ्या संस्कृतीची वेगवेगळी नृत्य कला असते- १) बेली डान्स या प्रकाराबद्दल माहिती पाहूया. युरोपमधील लेखक आणि चित्रकारांनी या नृत्य करणाऱ्या जिप्सी महिलांची चित्रे काढल्याने हा नृत्यप्रकाराला युरोपभर लोकप्रियता मिळाली. भटक्या लोकांप्रमाणे बेली डान्सर्सचा एक समूह असायचा, आणि ते फिरतीवर असताना नृत्य करायचे. हा बेली डान्स पाठीचा कणा ताठ ठेवून, कंबरेची जलद गतीने हालचाल करून, त्यासोबतच संपूर्ण शरीर एका लयबद्ध ठेक्यामध्ये हलवणे, अशा प्रकारे करण्यात येणारा बेली डान्स मान आणि पाठीच्या आरोग्यासाठी उत्तम आहे. तसेच हृदयाचं स्पंदन होण्यासाठी, आरोग्य उत्तम राखण्यासाठी हा नृत्यप्रकार अनेक कलाकार व्यवस्थित शिकून घेतात. या नृत्याने एका तासात साधारण ३०० ते ५०० कॅलरीज जाळल्या जातात. २) दुसरा प्रकार आहे हिप हॉप. यामध्ये १९७० मध्ये समोर आलेल्या हिप हॉप या नृत्यप्रकारात अपरॉक, ब्रेकिंग आणि फंक स्टाइल्स या प्रकारांचाही समावेश करण्यात येतो. जमैकन- अमेरिकन डीजे कूल हर्क याला हिप हॉप म्युझिकचा संस्थापक असे संबोधले जाते. हिप हॉप प्रकार अत्यंत ऊर्जादायी आहे. जबरदस्त ऊर्जेनेच तो परफॉर्म करावा लागतो. हिप हॉप संगीतासह स्ट्रीट जॅझ बरोबरही तो केला जातो. हा शांत नृत्य प्रकार नाही. काही निवडक शहरांमध्ये शैक्षणिक कार्यशाळा, प्रकल्प, विविध कार्यक्रम, व्याख्याने आयोजित करण्यात येतात. या कार्यक्रमांतर्गत जगभरामधून एक दिग्गज नृत्य कलाकाराची निवड करून त्यांच्या कडून एक सकारात्मक संदेश दिला जातो. प्रत्येक नृत्यप्रेमींसाठी जणू ही एक पर्वणीच ठरते. गेल्या दोन वर्षांत शांघाय आणि हवाना येथे हे सेलिब्रेशन होते आहे. यामध्ये जगभरातील दिग्गज कलाकार, विद्यार्थी आणि नृत्यप्रेमी आवर्जून हजेरी लावतात.

           जगभरामध्ये प्रत्येक वर्षी २९ एप्रिल हा दिवस आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी हा नृत्य दिवस मोठ्या उत्साहात जगभरात साजरा केला जातो. पण गेल्या दोनतीन वर्षांपासून सुरू झालेला कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता हा दिवस साजरा करण्यावर अनेक निर्बंध घालून बंधने आणली आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी व्हर्चुअल पद्धतीच्या माध्यमाने हा दिवस साजरा केला जात आहे, हे येथे उल्लेखनीयच!


!! विश्व नृत्य दिनाच्या सर्व नृत्यप्रेमी बंधुभगिनींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

                    - संकलन व शब्दांकन -

                    श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजी.

                   रामनगर वॉर्ड, गडचिरोली. जि. गडचिरोली.

                   फक्त व्हॉट्सॲप- 9423714883.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या