🌟लोकवर्गणीतून शाळेला मिळालेल्या टी.व्ही.संचांची चोरी करणारे ०२ चोरटे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात....!


🌟आरोपींकडून पोलीसांनी केला १९.५० हजारांचा मुद्देमाल जप्त🌟

फुलचंद भगत

वाशिम:-पो.स्टे.वाशिम ग्रामीण हद्दीतील ग्राम भटउमरा येथील वरिष्ठ प्राथमिक शाळा, भटउमरा, जि.वाशिम येथे गावकऱ्यांनी देणगी म्हणून दिलेल्या ०३ टी.व्ही. संचांची अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना घडली होती. सदर प्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापकांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध दि.१०.०४.२०२४ रोजी पो.स्टे.वाशिम ग्रामीण येथे अप.क्र.१९३/२४, कलम ४६१, ३८० भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर प्रकरणाचा समांतर तपास करत असतांना प्राप्त गोपनीय माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ०२ आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी सदर टी.व्ही.संच चोरी केल्याची कबुली दिली. सदर आरोपींकडून एलईडी स्मार्ट टी.व्ही. १) TCL कंपनीची ३२ इंची टी.व्ही. संच अंदाजे किंमत ६५००/- रु., २) QUADRIX कंपनीची ३२ इंची टी.व्ही. संच अंदाजे किंमत ६५००/- रु. व ३) TUNEXA कंपनीची ३२ इंची टी.व्ही. संच अंदाजे किंमत ६५००/- रु. असा एकूण १९,५००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणातील दोन्ही आरोपींना पुढील कार्यवाहीसाठी जप्त मुद्देमालासह पो.स्टे.वाशिम ग्रामीण यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री.अनुज तारे (IPS), अपर पोलिस अधीक्षक श्री.भारत तांगडे यांचे मार्गदर्शनाखाली पोनि.रामकृष्ण महल्ले, स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम व पथक सपोनि.रमाकांत खंदारे, पोहवा.प्रशांत राजगुरू, पोना.ज्ञानदेव मात्रे, पोकॉ.विठ्ठल महाले, दिपक घुगे, चापोहवा.रमेश जामकर यांनी पार पाडली. सर्व जनतेस सुजाण नागरिक या नात्याने अशा प्रकारची काही तक्रार असल्यास नियंत्रण कक्षास माहिती द्यावी, त्या इसमाचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या