🌟नांदेड लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत चव्हाण यांचा जंगी सत्कार....!


🌟राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सचिव स.मनबीरसिंघ ग्रंथी कार्यालयात श्री.चव्हाण यांचे जंगी स्वागत🌟 


नांदेड (दि.१७ एप्रिल) - नांदेड लोकसभा मतदारसंघातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व शिवसेना (उबाठा) या पक्षांच्या संयुक्त महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार वसंत चव्हाण यांनी आज मंगळवार दि.१७ एप्रिल २०२४ रोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सचिव स.मनबीरसिंघ ग्रंथी यांच्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली यावेळी प्रदेश सचिव स.मनबीरसिंघ ग्रंथी यांच्या वतीने त्यांचे फटाक्यांच्या आतिषबाजीत जोरदार स्वागत करुन त्यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन जंगी सत्कार सत्कार करण्यात आला.


यावेळी बोलतांना स.मनबीरसिंघ ग्रंथी म्हणाले की राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आघाडी धर्म इमानेइतबारे पाळून महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत चव्हाण यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणेल नांदेड जिल्हा हा पुर्वीपासून कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा गढ असल्याने या नांदेड लोकसभा मतदारसंघाला महाविकास आघाडीशिवाय आता पर्याय नसल्याचे या मतदारसंघातील सुजाण मतादरांनी ओळखल्याने महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत चव्हाण साहेब प्रचंड मताधिक्याने निवडून येतील असेही ते यावेळी म्हणाले.

यावेळी महाविकास आघाडीचे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या