🌟वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना अभिवादन....!


🌟निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांनी तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून केले अभिवादन🌟 

फुलचंद भगत

वाशिम: महाराष्ट्रातील एक आधुनिक संत, कवी, समाजसुधारक व राष्ट्रीय उत्थानाची सतेज भावना असलेले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती आज जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली.

              राजे वाकाटक सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांनी तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत  यांच्यासह उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या