🌟क्रांतीसूर्य महात्मा फुलेंना अभिवादन करून शेतकऱ्यांची मुलुख मैदानी तोफ रविकांत तुपकरांची खामगावात निघाली विराट रॅली...!


🌟समाज बांधवांना शुभेच्छा देत प्रत्यक्ष रॅलीत सहभागी होऊन त्यांनी उत्साह वाढविला🌟

खामगाव ::  स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रॊवणारे,  बहुजन समाजाचे उद्धारक,  क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त खामगावात आज समाजबांधव व बहुजन समाजाच्या वतीने विराट रॅली काढण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांचे आग्यामोहळ व शेतकऱ्यांची मुलुख मैदानी तोफ व शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून ओळखले जाणारे शेतकरी नेते जनसामान्यांचे अपक्ष उमेदवार रविकांत तुपकरांनी निघालेल्या रॅलीत सहभागी होवून क्रांतीसूर्य महात्मा फुलेंना अभिवादन केले.

          क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून रविकांत तुपकर यांनी खामगाव येथे महात्मा ज्योतीबा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. त्यानंतर शहरातून निघालेल्या मोटरसायकल रॅलीत ते सहभागी झाले. समाज बांधवांना शुभेच्छा देत प्रत्यक्ष रॅलीत सहभागी होऊन त्यांनी उत्साह वाढविला. महात्मा फुलेंचे विचार क्रांति घडविणारे आहेत. सत्यशोधकाच्या याच विचारांवर चालून बुलढाणा जिल्ह्यात नवी क्रांती घडविण्याच्या दिशेने आपली वाटचाल सुरू आहे. बहुजन समाजातील सर्वसामान्य जनतेचा मिळणारा उत्स्फूर्त पाठिंबा आणि समर्थन पाहता जिल्ह्यात आता निश्चितच परिवर्तन घडणार आहे, असे मत यावेळी शेतकऱ्यांचे आग्यामोहळ व शेतकऱ्यांची मुलुख मैदानी तोफ व शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून ओळखले जाणारे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी व्यक्त केले.... 

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या