🌟जंग-ए-अजित न्युज - महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या.....!


🌟दोन महिन्यांनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदावर दिसणार नाही प्रकाश आंबेडकर यांचे भाकीत🌟

✍️ मोहन चौकेकर

* देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, आदित्य ठाकरे मुख्यमंत्री करतो, मी दिल्लीला जातो, उद्धव ठाकरेंचा दावा  ; उद्धव ठाकरे भ्रमिष्ठ, त्यांना वेड लागलंय, आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याच्या दाव्यावर देवेंद्र फडणवीसांची जहरी टीका 

* इंडीया आघाडीवाले 4 जूननंतर एकमेकांचे कपडे फाडतील, केसं ओढतील, पंतप्रधान नरेंद्र मोदींची इंडिया आघाडीवर  टीका ; महादेव जानकर माझे लहान भाऊ, त्यांना संसदेत पाठवा, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे परभणीत मतदारांना आवाहन 

* माझ्या वाट्याला जाऊ नका, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांचा पंकजा मुंडेंना इशारा ; मनोज जरांगेंवर कधी टीका केली नाही आणि टीका केली तर मी कधीच शब्द मागे घेत नाही पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया 

* आमचे थोरले बंधू राजेंद्र पवार संभ्रम निर्माण करतात, रोहित पवारांना शरद पवार  उमेदवारी देत नव्हते, प्रतिभाकाकी कर्जतला जा म्हणाली; अजितदादा पवारांनी पवार कुटुंबातील गोष्टी उघड्या केल्या ; भाजपनं अजितदादा पवारांना लोकल नेता केलं; रोहित पवारांची बोचरी टीका 

* आपल्या आवडत्या चिन्हाला मतदान करुन बारामतीची सून म्हणून मला विजयी करा, सुनेत्रा पवारांचे आवाहन ; अजित पवारांनी कन्हेरीत  सुनेत्रा पवारांच्या प्रचाराचा नारळ फोडला 

* शरद पवार साहेब  तुम्ही नगर जिल्ह्यासह  महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांतील नेत्या नेत्यांमध्ये व अनेक कुटुंबां कुटुंबांमध्ये भांडण लावायचेच काम केलं,  शरद पवार साहेब तुम्ही तुमची कन्या सुप्रिया सुळे यांच्या विजयाची चिंता करा'; राधाकृष्ण विखेंची शरद पवारांवर जहरी टीका 

* जागा जिंका आणि मगच मुख्यमंत्री बनण्याच्या गोष्टी करा, चंद्रशेखर बावनकुळेंचं उद्धव ठाकरेंना चॅलेंज ; उमेदवार पाडापाडीची ट्रीक, चौरंगी लढतीत डमी उमेदवारांची गर्दी, हातकणंगलेत 2 सत्यजित, 2 धैर्यशील रिंगणात 

* छत्रपती कुटुंबाने राजर्षी शाहू महाराजांच्या नावाला साजेसं काम केलं नाही, वीरेंद्र मंडलिक यांची टीका ; सतेज पाटील आणि उद्धव ठाकरेंचा संजय मंडलिकांनी वापर केला, छत्रपतींवर टीका करण्याचं वीरेंद्र मंडलिकांचं वय नाही, संजय पवारांचे जोरदार प्रत्युत्तर 

* लातुरात अवकाळी पावसाचा धुमाकूळ, एका तासापासून गारांसह तुफान पाऊस, अक्कलकोट तालुक्यातील दोन गावांची वाहतूक बंद                 

* लोकसभेसाठी  महाविकास आघाडीच्या युतीमध्ये आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसने कमी जागा घेतल्या परंतु विधानसभेसाठी महाविकास आघाडीच्या युतीमध्ये आमची राष्ट्रवादी काँग्रेस जास्त जागा घेऊन जास्त जागा लढविणार 

* मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांचाही पक्ष काही महिन्यांत दिसणार नाही संजय राऊत यांचे भाकीत, संजय राऊत यांची टीका.

* दोन महिन्यांनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदावर दिसणार नाही प्रकाश आंबेडकर यांचे भाकीत.

* एखादा टिनटिप्पर मुंबईतुन येतो आणि अमरावतीच्या सुनेवर गलीच्छ भाषेत खालच्या पातळीवर टीका करतो हे चुकीचे आहे नवनीत राणा यांची संजय राऊत यांच्यावर टीका.                                       

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या