🌟पती परमेश्वराच्या अपघाती निधनाची वार्ता समजताच पत्नीने ही घेतला जगाचा निरोप....!


🌟नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातल्या मौजे बेंद्री येथील दुर्देवी घटना🌟

नांदेड - नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातल्या मौजे बेंद्री येथील अरुण बाबुराव बेंद्रीकर वय ३२ वर्ष हे काल शनिवार दि.०६ एप्रिल २०२४ रोजी रात्री ०९-०० ते ०९-३० वाजेच्या सुमारास बेंद्री या गावी आपल्या मोटरसायकलने जात असताना त्यांना कोलंबी ते मांजरम दरम्यान अपघात झाला. या अपघातात त्यांचे जागीच निधन झाले. त्यांच्या खिशातील कागदपत्रे पाहून त्यांच्या घरी निरोप दिला असता त्यांच्या पत्नी स्नेहा अरुण बेंद्रीकर यांना ही वार्ता समजताच त्यांनी देखील स्वतःच्या राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली. त्यांच्या पश्चात दोन वर्षाची एक मुलगी आहे. पती-पत्नीच्या या अकाली निधनाने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या