🌟पोहरादेवी मंदीर परिसरात प्रशासनाकडुन लावले जनजागृतीपर पोस्टर्स....!


🌟यात्रेच्या निमित्ताने नैसर्गिक आपत्ती व उष्माघाताबाबत छपाई करण्यात आलेले पोस्टर माध्यमातून जनजागृती🌟


फुलचंद भगत

वाशिम:-मा.श्रीमती बुवनेश्वरी एस.भाप्रसे जिल्हाधिकारी वाशिम यांचे आदेशानुसार व मा श्री विश्वनाथ घुगे निवासी उपजिल्हाधिकारी वाशिम, मा श्री कैलास देवरे उप विभागीय अधिकारी कारंजा यांचे सूचनेनुसार दिनांक 16/04/2024 रोजी पोहरादेवी येथे मंदिर परिसरात, आरोग्य प्रत्येक बुथवर, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण वाशिम अंतर्गत आपत्ती व्यवस्थापन संदर्भात छपाई करण्यात आलेले साहित्य पोस्टर यात्रे मधील भाविक भक्त यांना वाटप करण्यात आले.तसेच पोहरादेवी येथील मंदिर परिसरात, आरोग्य बुथवर, ग्रामपंचायत कार्यालय, पशू वैद्यकिय दवाखाना,शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, सार्वजनिक ठिकाणी नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाचे पोस्टर नैसर्गिक आपत्ती व उष्माघाता बाबत लावण्याबाबत सुचित करण्यात आले आहे.


यावेळी प्रधमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ अनिरुद्ध जाधव, जिल्हा पथकाचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत, श्री संदीप आडे, मारोती खंडारे, तोकिर बेनीवाले , मुकिंदा कांबळे, आरोग्य सेवक यावेळी उपस्थित होते.यावेळी मोठ्या प्रमाणात यात्रेच्या निमित्ताने नैसर्गिक आपत्ती व उष्माघाताबाबत छपाई करण्यात आलेले पोस्टर माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या