🌟पुर्णा तालुक्यातील धनगर टाकळी येथे आज हभप.आकाश महाराज खोकले यांचे हरिकीर्तन.‌....!


🌟आज रात्री आठ वाजता हभप.आकाश महाराज खोकले यांच्या हरिकीर्तनाला सुरुवात🌟 

पुर्णा (दि.१० एप्रिल) : पुर्णा तालुक्यातील धनगर टाकळी येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी राम नवमी निमित्त व ब्रम्हीभुत ब्रम्हचैतन्य स्वानंद सुख निवासी संत मोतीराम महाराज व मारुती महाराज दस्तापुरकर यांनी सुरू करून दिलेली परमपंरा आज बुधवार दि.१० एप्रिल २०२४ रोजी अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात झाली आहे.

दरम्यान आज बुधवार दि.१० एप्रिल रोजी रात्री आठ ते दहा या वेळात महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकार श्री ह.भ.प.आकाश महाराज खोकले गंगाखेडकर यांचे हरिकीर्तन होणार आहे व सायंकाळी पाच वाजता,भक्तांसाठी महाप्रसाद होईल व पुढील सात दिवस महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकाराचे हरी किर्तने होनार आहे तरी या हरी किर्तन व महाप्रसाद यांचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त गावकरी धनगर टाकळी ग्रामस्थ यांनी केले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या