🌟पुर्णा तालुक्यातील एरंडेश्वर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी गौरव गजानन खाकरेचे नवोदय परिक्षेत घवघवीत यश....!


🌟त्यांच्या या यशाबद्दल त्याचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे🌟 

पुर्णा : पुर्णा तालुक्यातील एरंडेश्वर येथील जिल्हा परिषद प्रशाला शाळेतील विद्यार्थी गौरव गजानन खाकरे हा जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2023-24 मध्ये घव-घवीत यश संपादन करून प्रवेशास पात्र ठरला आहे. 

प्रशालेतील पाच पदे रिक्त असतानाही उपलब्ध परिस्थितीत शाळेने मिळवलेले यश उल्लेखनीय आहे. त्याबद्दल एरंडेश्वरचे सरपंचाचे प्रतिनिधी मुंजाजी पिसाळ शाळेचे मुख्याध्यापक प्रेमेंद्रभावसार, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मुंजाजी काळे,सदस्य ओमप्रकाश काळे, मार्गदर्शक शिक्षक कैलास जाधव, सचिन ठोंबरे, मधुकर बचुवार, हरिप्रसाद गायकवाड, हेमंत लहाने, रूपाली ठाकूर,एरंडेश्वर येथील नागरिकांनी अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या