🌟परभणी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार महादेव जानकरांना निवडून माझा आवाज बुलंद करा....!

🌟भाजपाच्या राष्ट्रीय सचिव तथा मा.मंत्री रणरागिणी पंकजाताई मुंडे यांचे जिंतूर येथील संयुक्त बैठकीत प्रतिपादन🌟 


परभणी (दि.२३ एप्रिल) :  परभणी लोकसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस-रिपाइं-रासप या संयुक्त महायुतीचे उमेदवार तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेवराव जानकर यांना परभणीकरांनी प्रचंड बहुमताने निवडून द्यावे व त्याद्वारे माझाही आवाज बुलंद करावा असे आवाहन भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव तथा माजी मंत्री रणरागिणी पंकजाताई मुंडे यांनी जिंतूर येथे आयोजित संयुक्त बैठकीत केले.

          महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ आज मंगळवार दि.२३ एप्रिल रोजी जिंतूर येथे आयोजित केलेल्या महायुतीच्या नेतेमंडळींसह कार्यकर्त्यांच्या संयुक्त बैठकीप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी आयोजक आमदार सौ. मेघना साकोरे-बोर्डीकर, पक्षाचे प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर, महादेवराव चव्हाण, गणेशराव हाके, देविदास राठोड, जिल्हाध्यक्ष संतोष मुरकूटे, भागवत बाजगिरे, खंडेराव आघाव, विठ्ठलराव रबदडे, विलास गिते, सचिन गोरे, प्रा. पी.टी. चव्हाळ, प्रमोद कराड, ब्रिजगोपाल तोष्णीवाल, बाळासाहेब घुगे, विनोद राठोड, कृष्णा देशमुख, लक्ष्मण बुधवंत आदी याप्रसंगी उपस्थित होते.

           मुंडे यांनी आपल्या भाषणातून जानकर यांचे मुक्तकंठाने कौतूक केले. जानकर म्हणजे अत्यंत गरिब माणूस, घरास पाठ दाखविल्यानंतर या माणसाने परत घर पाहिले नाही. समाज हाच परिवार मानला. समाजाच्या हिताच्या दृष्टीकोनातून सातत्याने प्रयत्न केले, लढे दिले, संघर्ष केला, असे नमूद करतेवेळी जानकर यांच्यासारख्या गरिब माणसाने, चळवळीतल्या व्यक्तीने संसदेत आलेच पाहिजे, तरच गोरगरिबांचा आवाज संसदेत आणखीन बुलंद होईल, आपले ते बांधू आहेत, आपल्याप्रमाणे ते ही संसदेपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. जानकर यांच्या विजयाने आपलाही आवाज हा बुलंद होणार आहे, असे स्पष्ट केले.

           पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भक्कम समर्थन, साथ देण्याकरीता प्रत्येक मत गरजेचे आहे. त्यामुळे परभणीकरांनी आपलं मत वाया घालता कामा नये, स्वतःसह इतरांचेसुध्दा अधिकाधिक मतदान महायुतीच्या पारड्यात पडावे या दृष्टीने प्रयत्नांची पराकाष्टा करावी, असेही आवाहन करीत मुंडे यांनी पंतप्रधानांच्या सभेनेच जानकर यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाला आहे. परंतु, कार्यकर्त्यांनी येत्या दोन-चार दिवसात अत्यंत नेटाने, जिद्दीने प्रत्येक बुथ सांभाळून अधिकाधिक मतदानासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी, अशी अपेक्षा मुंडे यांनी व्यक्त केली.

          पुलाखालून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहिले आहे. राजकीय चित्र पूर्णतः बदलले आहे. परंतु, कार्यकर्त्यांनी या मतदारसंघातून निश्‍चितच परिवर्तनाची लाट आणणे गरजेचे आहे. त्याशिवाय या मतदारसंघाच्या खुंटलेल्या विकासास दिशा मिळणार नाही, असेही त्या म्हणाल्या. स्वतःची अडचण, स्वतःचे दुःख, स्वतःच्या वेदना दूर ठेवून ठिकठिकाणी सभांना धावून जात आहोत, कै.गोपीनाथराव मुंडे यांचा तो गुण आपल्या अंगी आला आहे. त्यामुळे समाजहित हेच ध्येय समाजविकास व समाजाचे परिवर्तन हीच संधी प्रत्येकाने साधली पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.

          दरम्यान, आमदार साकोरे यांनी आपल्या प्रास्ताविकातून या मतदारसंघात जानकर यांचा विजय निश्‍चित आहे. जिंतूर, सेलूतून 90 टक्के मतदान जानकर यांच्या पारड्यात जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या