🌟सोनपेठ तालुक्यातील शेळगावत वीज पडून बैलाचा दुर्दैवी मृत्यू....!


🌟तात्काळ पंचनामा करण्याच्या सखाराम बोबडे पडेगावकर यांची सोनपेठ तहसीलदारांना सूचना🌟

सोनपेठ : सोनपेठ तालुक्यातील शेळगाव येथील शेतकऱ्याच्या शेतातील बैलावर वीज पडून त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज बुधवार दि.१० एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ०७-०० वाजेच्या सुमारास घडली या घटनेनंतर ग्रामस्थांनी ही बाब परभणी लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांना कळवत प्रशासकीय मदत तात्काळ मिळवून देण्याची विनंती केली.

शेगाव येथील शेतकरी हलगे यांच्या बैलाच्या अंगावर वीज पडल्याने मृत्यू झाला घडली . दुर्दैवी घटनेनंतर तात्काळ ग्रामस्थांनी परभणी लोकसभा मतदारसंघाचे आपक्ष उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांना उमेदवारी कळवली. महसूल विभागाचा पंचनामा झाल्याशिवाय शासकीय मदत मिळत नसल्याने हा पंचनामा करण्यासाठी प्रशासनाला कळवावे अशी मागणी ग्रामस्थांनी सखाराम बोबडे पडेगावकर यांच्याकडे केली. यावरून सखाराम बोबडे यांनी तात्काळ तहसीलदार सुनील कावरखे यांच्याशी संवाद साधत पंचनामा करण्याची सूचना केली. गुरुवारी सकाळी पंचनामा होईल असे तहसीलदार यांनी सांगितले. लोकसभेचे सर्व उमेदवार प्रचारात गुंग असताना सखाराम बोबडे पडेगावकर यांनी मात्र वेळ काढून त्या शेतकऱ्याला मदत करण्याची भूमिका घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या