🌟परभणी लोकसभा निवडणूकीत प्रहार जनशक्ती पक्षाचा कोणालाही पाठिंबा नाही - जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने


🌟परभणी लोकसभा निवडणुकीत पांठीब्यासाठी अनेक उमेदवारांनी आ.बच्चुभाऊ कडू यांच्याकडे विनंती केली होती🌟 

परभणी - प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मा. आ. बच्चुभाऊ कडू यांच्या आदेशानुसार परभणी लोकसभा मतदार संघ निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्षाने कुठल्याही राजकीय पक्ष अथवा उमेदवारास पांठिबा दिलेला नाही त्यामुळे या निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्ष तटस्थ भुमिका घेत असल्याची माहिती प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी दिली.

परभणी लोकसभा निवडणुकीत स्थानिक विकासाचे मुद्दे तसेच परभणी जिल्हातील बेरोजगारी, ओस पडलेल्या औद्योगिक वसाहतींचा विकास, रखडलेले सिंचन प्रकल्प, जिल्हातील रस्ते व मुलभूत सुविधा, जिल्हातील आरोग्याचा प्रश्न, शेती मालाला भाव, कृषी मालावरील पक्रिया केंद्र निर्मिती तसेच शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर व सामान्य परभणीकरांच्या या अत्यंत महत्वाच्या अशा मुलभूत प्रश्नाकडे दुलक्ष केले जात असून केवळ जातीच्या आधारावर हि निवडणूक होत आहे. हे परभणी जिल्हाच्या विकासासाठी व जिल्हाच्या भविष्यासाठी अत्यंत गंभीर बाब आहे. सर्व पक्षीय उमेदवारांच्या प्रचारामध्ये विकासा ऐवजी जाती धर्माचा वापर केला जातो व विकासाच्या मुद्यावर कुठलिच भुमिका घेतली जात नाही. त्यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाने या निवडणुकी मध्ये तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकसभा निवडणुकीत पांठीब्यासाठी अनेक उमेदवारांनी मा.आ. बच्चुभाऊ कडू यांच्याकडे विनंती केली होती परभणी लोकसभा मतदार संघातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्या नंतर  कुठल्याही राजकीय पक्ष व उमेदवारास पाठींबा न देण्याचा निर्णय पक्षाच्या वतीने घेण्यात आला आहे. या निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्व पदाधिकारी, प्रहार सैनिक व मा. आ. बच्चुभाऊ कडू यांना मानणारा जो वर्ग आहे त्यांनी एक मतदार म्हणून आपल्या हक्काचे स्वतः चे मतदान करावे परंतू कुठल्याही पक्षाला किंवा उमेदवाराला पांठिबा किंवा त्यांचा प्रचार करु नये असा आदेश पक्षाचे अध्यक्ष मा. आ. बच्चुभाऊ कडू यांनी दिला असून जिल्हातील प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्याने याचे तंतोतंत पालन करावे असे अवाहन प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांच्या वतीने करण्यात आले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या