🌟गंगाखेड शहरात स्वीप अंतर्गत मतदार जनजागृती साठी सायकल रॅलीचे आयोजन....!


🌟सायकल रॅलीची सुरुवात सकाळी उपविभागीय अधिकारी कार्यालयापासून करण्यात आली होती🌟 

परभणी :  लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर स्वीप (SVEEP) अंतर्गत काल शनिवार दि.13 एप्रिल 2024 रोजी  गंगाखेड विधानसभा मतदार संघात मतदान जनजागृतीसाठी गंगाखेड शहरात सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. 


सायकल रॅली ची सुरुवात सकाळी 7.00 वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालय पासून ते पुढे दिलकश चौक -भगवती चौक - संत जनाबाई मंदिर - गोदावरी घाट - शनी मंदिर - अहिल्यादेवी होळकर चौक - डॉक्टर लाईन - भाग्यनगर -  महाराणा प्रताप चौक - पोलीस स्टेशन - या मार्गाने तहसील कार्यालय गंगाखेड येथे समारोप करण्यात आला. मतदार जनजागृती सायकल  रॅलीमध्ये उपविभागीय अधिकारी  जीवराज डापकर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे, तहसीलदार  श्री. शेलार, गंगाखेड नगरपरिषद मुख्याधिकारी जयवंत सोनवणे, पूर्णा नगरपरिषद मुख्याधिकारी युवराज पौळ, गटविकास अधिकारी श्री. मोडके, गटशिक्षणाधिकारी नारायण ठुले, शिक्षण विस्तार अधिकारी श्री. नागरगोजे, नायब तहसीलदार अशोक केंद्रे, मंडळ अधिकारी श्री. सोडगीर, प्रा. सुर्वे, सुनील चाफळे, अंतराम मुंडे,  सर्व महसूल, पोलीस,  शिक्षण विभागाचे अधिकारी, तसेच संत जनाबाई सायकलिंग क्लब गंगाखेडचे सदस्य डॉ. भगवान केंद्रे, डॉ. सुनील तोष्णीवाल, शिवप्रसाद मठपती, ओम बिडकर, सूर्या बडवणे, संतोष शिंदे, नितेश अल्लडवार, हरिओम निरस, रघुनंदन चव्हाण, गणेश कदम, सचिन वाळके उपस्थित होते. 

मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो, मतदान करा मतदान करा लोकशाहीला बळकट करा, लोकशाहीचा विजय असो, अशा विविध घोषवाक्याची गर्जना करत संपूर्ण गंगाखेड शहरात सायकल रॅली काढण्यात आली......


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या