🌟परभणी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांचा सेलूत श्रीराम नवमी शोभायात्रेत सहभाग...!


🌟प्रभु श्रीरामचंद्रांचे दर्शन घेऊन श्रीराम भक्तांना श्रीराम नवमीच्या दिल्या शुभेच्छा🌟 


परभणी (दि.१७ एप्रिल) - परभणी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार महादेव जानकर हे आज मंगळवार दि.१७ एप्रिल रोजी सेलू येथे प्रचार दौऱ्यात असताना त्यांनी सेलू येथील श्रीराम नवमी शोभा यात्रेत मोठ्या श्रद्धेने सहभाग नोंदवला यावेळी महादेव जानकर यांनी श्रीराम भक्तांना श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. 


यावेळी बोलतांना श्री.जानकर म्हणाले की मर्यादेत राहूनही संयमाने प्रत्येक कार्य यशस्वीपणे पूर्ण करता येऊ शकते हे रामचरित्र शिकवते त्याग,समर्पण,पराक्रमाची शिकवण देणाऱ्या प्रभू रामचंद्रांची स्मरण करणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले यावेळी महायुतीतील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह श्री रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या