🌟हिमायतनगर येथे तीन दिवसीय श्रीराम कथेला दि.15 एप्रिल पासून सुरुवात....!


🌟श्रीराम कथा गजानन विजय बंडेवार यांच्या मळ्यामध्ये दररोज सायंकाळी चार ते सात या वेळेत होणार🌟

नांदेड (दि.05 एप्रिल) : येथील ज्ञानेश्वर अभ्यास मंडळाने हिमायतनगर येथे 'महर्षी वाल्मिकी श्रीराम कथा, एक नवा दृष्टिकोन' यांचे आयोजन दिनांक 15 ते 17 एप्रिल रोजी करण्यात आले आहे. प्रवक्ता  शास्त्री प्रा. सु.ग. जाधव यांची ही श्रीराम कथा गजानन विजय बंडेवार यांच्या मळ्यामध्ये दररोज सायंकाळी 4 ते 7 या वेळेत होणार आहे.

सदरील श्रीराम कथा आजच्या काळामध्ये कशी उपयोगी आहे. त्याचप्रमाणे रामायणातील विविध पात्रांची मनोभूमिका, त्या काळातील जनजीवन आणि प्रश्न आणि रामायणातील वादग्रस्त प्रश्न यावर देखील निरूपण होणार आहे दिनांक 15 आणि 16 एप्रिल रोजी सदरील श्रीराम कथा सायंकाळी 04-00 ते 07-00 या वेळेत होईल तर 17 एप्रिल 2024 रोजी श्रीराम नवमी सकाळी 09-00 ते 12-00 या वेळेत होणार आहे.

याच दिवसात सकाळी 08-00 ते 09-00 वैदिक हवन पुरोहित ओंकारेश्वरी कदम यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे. या श्रीराम कथेच्या आधुनिक दृष्टिकोनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ज्ञानेश्वर अभ्यास मंडळाच्यावतीने ऍड. ऋतध्वज कदम आणि गजानन बंडेवार यांनी केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या