🌟पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेतून महायुतीतील काही नेतेमंडळींनी आपल्या विरोधात केलेले आरोप धादांत खोटे...!


🌟परभणीतील सभेत आरोप करणाऱ्यांना खा.संजय जाधव यांचे प्रत्तुत्तर : म्हणाले आरोप सिध्द करा राजकीय संन्यास घेतो🌟  

परभणी (दि.२१ एप्रिल) :  परभणीत काल शनिवार दि.२० एप्रिल रोजी झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेतून महायुतीतील काही नेतेमंडळींनी आपल्या विरोधात केलेले आरोप हे धादांत खोटे आहेत विरोधकांनी ते आरोप सिध्द केले तर आपण राजकीय संन्यास तात्काळ घेवू असे प्रत्तुत्तर महाविकास आघाडीचे उमेदवार खा.संजय उर्फ बंडू जाधव यांनी दिले.

             पंतप्रधान मोदी यांच्या शनिवारच्या सभेत माजीमंत्री बबनराव लोणीकर तसेच उमेदवार महादेव जानकर या दोघांसह अन्य काही मंडळींनी जाधव यांच्यावर टिका टिप्पणी करतेवेळी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे काही गंभीर स्वरुपाचे आरोप केले. विशेषतः जाधव यांनी संस्थानच्या जमीनी हडपल्याचा आरोप केला. त्यास प्रत्तुत्तर म्हणून जाधव यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना ते आरोप धादांत खोटे आहेत, त्यात कोणतीही सत्यता नाही, त्यामागे कोणताही धागादोरा नाही, ताळमेळ नाही, आरोप करणार्‍यांनी विचारपूर्वक आरोप केला पाहिजे. आपल्या विरोधात खरोखरच पुरावे असतील तर ते सिध्द करावेत, आपण निश्‍चितच राजकीय संन्यास घेवून घरी बसू, पुरावे सिध्द न केल्यास विरोधक काय करतील हे त्यांनी सांगावे, असेही ते म्हणाले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या