🌟सामाजिक समतेसाठी महामानव विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी कार्य केले - प्राचार्य डॉ रामेश्वर पवार


🌟डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या व्याख्याना प्रसंगी ते म्हणाले🌟


प्रतिनिधी

पुर्णा (दि.१४ एप्रिल) -  महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक समतेसाठीचे महान कार्य केले असल्याचे प्रतिपादन प्राचार्य डॉ. रामेश्वर पवार यांनी केले संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या व्याख्यानाच्या कार्यक्रमात अध्यक्षीय समारोप प्रसंगी ते बोलत होते. स्त्रिया - उपेक्षित शोषित ,कामगार यांच्या उध्दारासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक आंदोलने  केले असून   खऱ्या अर्थाने आज त्यांच्या विचारांची आणि आंदोलनाची  गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.


या कार्यक्रमाच्या सुरुवातीला महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस प्राचार्य डॉ रामेश्वर पवार यांनी पुष्पहार अर्पण करून महाविद्यालयाच्या वतीने विनम्र अभिवादन केले.याप्रसंगी प्रमुख पाहुणे प्रा. डॉ .संजय कसाब यांनी महामानव बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची ओळख करून देताना त्यांचे संविधान निर्मितीचे कार्य ,त्यांची विचारधारा ,आंतरराष्ट्रीय ख्याती, आजच्या लोकशाही मूल्यांच्या होणाऱ्या पडझडी विषयी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराची अशी गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. स्वातंत्र्य ,समता ,बंधुता आणि न्याय या लोकशाही मूल्याबरोबरच प्रेम आणि  बंधुभाव या देशाला गरजेचा असल्याचेही त्यांनी आपल्या व्याख्यानात सांगितले .या कार्यक्रमाचे औचित्य साधून  महाविद्यालयाच्या वतीने ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते .या ग्रंथ प्रदर्शनाचे उदघाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .रामेश्वर पवार यांच्या हस्ते करण्यात आले .

या संयुक्त कार्यक्रमांचे प्रस्ताविक विद्यार्थी विकास विभागाचे समन्वयक डॉ. प्रकाश सूर्यवंशी यांनी केले.  महाविद्यालयातील प्राध्यापक ,कर्मचारी व विद्यार्थी यांनी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ .प्रकाश सूर्यवंशी यांनी केले तर आभार ग्रंथपाल डॉ .विलास काळे यांनी मांनले .कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक ,कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या