🌟पुर्णा शहरातील भिम नगरातील भिम जयंती मंडळाच्या वतीने भिम जयंती उत्साहात साजरी....!


🌟महामानव विश्वरत्न परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती निमित्त भव्य मिरवणूकीचे प्रथमच आयोजन🌟 


पुर्णा (दि.१५ एप्रिल) - भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव विश्वरत्न बोधीसत्व परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती काल रविवार दि.१४ एप्रिल २०२४ रोजी पुर्णा शहरातील भिम नगर जयंती मंडळाच्या वतीने मोठ्या हर्षोल्लासात साजरी करण्यात आली यावेळी सर्वप्रथम अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतमबुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादंन करून पंचशील धम्मध्वजाचे पोलीस निरीक्षक विलासजी गोबाळे यांच्या हस्तें ध्वजारोहण करण्यात आले यावेळी सर्व भिमनगर व अशोकनगर येथील उपासक उपसिका यांनी त्रिशर पंचशीलाचे ग्रहण करून बोधीसत्व परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य दिव्य मिरवणुक काडण्यात आली सदरील मिरवणुकी मध्ये विविध प्रकारचे सामाजिक/धार्मिक देखावे साजर करण्यात आले होते.

पुर्णा शहरातील भिमनगर परिसरातून प्रथमच काढण्यात आलेली भव्य भिम जयंती महोत्सव मिरवणुक अण्णाभाऊ साठे नगर,छत्रपती शिवाजी महाराज नगर (मराठगल्ली),शहिद भगतसिंग चौक,सोनार गल्ली,छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवाजी पुतळा परिसर,महात्मा बसवेश्वर चौक आदी परिसरातील महापुरुषांना अभिवादन करीत डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात पोहोचल्यानंतर महामानव विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास लाखोंच्या जनसागराच्या साक्षीने अभिवादन करुन भव्य ऐतिहासिक भिम जयंती मिरवणुकीची सांगता करण्यात आली.

भिम नगर येथून काढण्यात आलेली भव्य भिम जयंती मिरवणूक यशस्वी करण्यासाठी जयन्ती मंडलाचे अध्यक्ष विलास अशोक गायकवाड,उपाध्यक्ष मनोज चंद्रकांत भवरे,सचिव ॲड.सिद्धांत वसंतराव गायकवाड,शेखर लक्ष्मण गवळी,कोषाध्यक्ष अविनाश हरिभाऊ  गायकवाड व जयंती मंडलाती सर्व पदधकारी व भिमनगर मित्र परिवार यांनी विशेष परिश्रम घेतले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या