🌟पुर्णा तालुक्यातील पिंपळगाव बाळापूर वाळू विक्री डेपोवर नियमबाह्य वाळूची अक्षरशः लुटमार....!


🌟महसूल प्रशासन व वाळू डेपो धारकाचे संगणमत ? निर्धारित क्षेत्र सोडून जेसीबी यंत्राच्या साहाय्याने नदीपात्रातून प्रचंड उत्खनन🌟



पुर्णा तालुक्यातील मौ.पिंपळगाव बाळापूर येथील शासकीय वाळू विक्री डेपो धारकांने महसूल प्रशासनाने ठरवून दिलेल्या सर्व नियम अटी व शर्तींची अक्षरशः पायमल्ली करीत जेसीबी यंत्रांच्या साहाय्याने ठराविक क्षेत्र सोडून प्रचंड प्रमाणात अवैधरित्या वाळू उत्खनन करीत या अवैध चोरट्या वाळूची रॉयल्टी पावत्यांशिवाय असंख्य विदाऊट जिपीएस वाहनांतून वाहतूक करीत अवयवांच्या सव्वा दराने विक्री करण्याचा उद्योग महसूल प्रशासनातील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संगनमतातून आरंभल्यामुळे शासनाचा लाखों रुपयांचा महसूल चोरांच्या खिशात जात आहे त्यामुळे सर्वसामान्य जनतेला घर बांधकामासाठी अल्पदरात वाळू उपलब्ध करुन देण्याचे शासनाचे धोरण संपूर्ण तालुक्यात पायदळी तुडवले जात आहे.


पुर्णा तालुक्यातील मौ.पिंपळगाव बाळापूर येथील एकमेव अधिकृत वाळू विक्री डेपो असलेल्या या वाळू विक्री डेपो धारकाकडील रॉयल्टी पावत्या संपल्यानंतर देखील संबंधित वाळू विक्री डेपोधारक रॉयल्टी पावत्यांशिवाय असंख्य वाहन खुलेआम नदीपात्रात उभी करुन जेसीबीच्या साहाय्याने भरत असतांना महसूल प्रशासनातील अधिकारी कुंभकर्णी झोपेत आहेत की झोपेचं सोंग घेऊन लक्ष्मीनारायणचा जाप करीत आहेत ? असा प्रश्न उपस्थित होत आहे शासकीय नियमाप्रमाणे संबंधित वाळू विक्री डेपो धारकाने वाळू वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांना जीपीएस बसवने तसेच सर्वं वाळू वाहतूक करणारी वाहन एकाच रंगाची ठेवणे, महसूल प्रशासनाने ठरवून दिलेले गट क्षेत्र निर्धारित करण्यासाठी सिमा खांबांसह झेंडे लावले,उत्खनना क्षेत्रासह संपूर्ण परिसर व मार्गावर सिसीटीव्ही कॅमेरे/लाईट बसवणे तसेच एक रॉयल्टी पासवर केवळ एकच वेळ वाहनाचा नंबर/वेळ टाकून वाळू वाहतूक करणे असे नियम असतांनाच संबंधित वाळू विक्री डेपो धारक महसूल प्रशासनाच्या कुठल्याही नियमांचे पालन न करता संपूर्ण नदीपात्र जेसीबी यंत्राच्या साहाय्याने अक्षरशः रात्रंदिवस ओरबाडून काढीत असल्याने महसूल प्रशासनासह जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी संबंधित वाळू डेपो धारकासह महसूल प्रशासनातील बेजबाबदार अधिकाऱ्यांवर देखील कायदेशीर कारवाई करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे....




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या