🌟नांदेड येथील कुसुम सभागृहात २० एप्रिलला परिवर्तनवादी युवा वक्ते प्रा.विठ्ठल कांगणे यांचे व्याख्यान...!


🌟महावितरण/महापारेषण कंपनीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांतर्फे महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आयोजन🌟

नांदेड, (प्रतिनिधी) - नांदेडच्या कुसुम सभागृहामध्ये येत्या २० एप्रिल रोजी महाराष्ट्रातील प्रसिद्ध परिवर्तनवादी युवा वक्ते प्रा. विठ्ठल कांगणे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.'आधुनिक भारताचे शिल्पकार- डॉ. बाबासाहेब आंबेडकर' या विषयावर विठ्ठल कांगणे विचार मांडणार आहेत.

 क्रांतीसुर्य  महात्मा ज्योतिराव फुले आणि विश्वरत्न- बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीच्या औचित्याने  सकाळी १० वाजता व्याख्यानाला सुरुवात होणार आहे. महावितरण आणि महापारेषण कंपनीतील अभियंते,अधिकारी व कर्मचारी यांच्यातर्फे या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता अनिल डोये या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत.

 आणि महावितरण नांदेड मंडळाचे अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव, महापारेषण परळी मंडळाचे अधीक्षक अभियंता मिलिंद बनसोडे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या व्याख्यानमालेला महापारेषण आणि महावितरण कंपनीच्या सर्व अधिकारी, अभियंते, कर्मचारी आणि जनमित्र बंधू- भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.


---------


राजकुमार सिंदगीकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या