🌟पुर्णेत रेल्वे स्थानकावर पटरी ओलांडतांना मालगाडीखाली आल्याने २५ वर्षीय युवकाचा पाय कापला गेल्याची घटना...!


🌟अपघातग्रस्त इसम राजस्थान येथील कामगार असल्याचे व नरसी नायगाव येथे टाईल्सच्या कामासाठी जात होता असे समजते🌟 

पुर्णा (दि.०५ एप्रिल) - पुर्णा येथील रेल्वे स्थानक क्रमांक तीन रेल्वे पटरी ओलांडून जात असतांनाच मालगाडीखाली आल्याने अंदाजे २५ वर्षीय प्रवासी इसमाचा पाय कापला गेल्याची दुर्दैवी घटना आज शुक्रवार दि.०५ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ०६-१० वाजेच्या सुमारास घडली अपघातग्रस्त इसम घटनेनंतर जवळपास दिड तास जागेवरच तडफडत पडून होता परंतु त्याला कोणीही दवाखान्यात नेण्यास तयार नव्हते शेवटी ०७-५० वाजेच्या सुमारास रेल्वे सुरक्षा यंत्रणांनी सरकारी अंबूलंन्स बोलावून त्याला शासकीय ग्रामीण रुग्णालय पुर्णा येथे पोहोचविण्याचे समजते.

या दुर्घटनेत मालगाडी खाली येवून पाय गमावलेल्या युवकांचे नाव विक्रम सुगनाराम बरवड असे असून तो राजस्थान राज्यातील गुडा बोडकी तालुका गुडा जिल्हा झुनझून येथील रहिवासी असून तो टाईल्स फरशीचे काम करणारा कामगार असल्याने टाईल्सचे काम करण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील नरसी नायगाव येथे जाण्यासाठी निघाला असतांना सदरील दुर्घटना घडल्याचे समजते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या