🌟परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांची मतदान केंद्रास भेट....!


🌟यावेळी त्यांनी मतदान केंद्रातील केंद्राध्यक्ष/मतदान अधिकाऱ्यांशी संवाद साधुन मतदान प्रक्रियेची माहिती घेतली🌟

परभणी (दि.26 एप्रिल) : 17-परभणी लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी आज सकाळी 7 वाजेपासून मतदान प्रक्रियेस शांत वातावरणात सुरुवात झाली. त्या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक‍ निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे यांनी आज 17-परभणी लोकसभा मतदार संघातील विविध मतदान केंद्रास भेट दिली. 

जिल्हा निवडणुक‍ निर्णय अधिकारी श्री. गावडे यांनी यावेळी परभणी शहरातील मराठवाडा हायस्कुल, शिवाजी नगर, जाकीर हुसैन महाविद्यालय, खंडोबा बाजार, अभियांत्रीकी महाविद्यालय, खंडोबा बाजार, नांदखेडा रोडवरील बेलेश्वर नर्सिंग कॉलेज आदी मतदान केंद्रावर प्रत्यक्ष भेट देवून मतदान प्रक्रिया योग्यरित्या होत असल्याची पाहणी केली. यावेळी श्री. गावडे यांनी मतदान केंद्रातील केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकाऱ्यांशी संवाद साधुन मतदान प्रक्रियेची माहिती जाणुन घेतली......

 ****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या