🌟हिंगोली विधानसभा मतदार संघात भारतीय जनता पार्टीला धक्का.....!


🌟भाजपा किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष दिनकरराव देशमुख यांचा शिवसेना (उबाठा) पक्षात प्रवेश🌟


हिंगोली : भाजपा किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी सभापती दिनकरराव देशमुख यांनी आज दि.२० एप्रिल शनिवार रोजी वसमत येथे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात  शिवसेना नेते तथा विधान परीषदेचे विरोधी पक्षनेते आंबादास दानवे व हिंगोली संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांच्या हस्ते जाहीर प्रवेश केल्याने भाजपला हिंगोली विधानसभेत मोठा धक्का बसल्याचे दिसत आहे.दि.२४ एप्रिल रोजी पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे यांच्या हदगाव येथील विराट प्रचार सभेत देशमुख यांच्या असंख्य समर्थकासह भाजपा पदाधिकारीऱ्यांचा जाहीर प्रवेश होणार असल्याची माहिती असल्याची माहिती दिनकरराव देशमुख यांनी प्रसार माध्यमाची सांगितले.

भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी सभापती दिनकरराव देशमुख यांनी ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आपल्या समर्थकासह शिवसेना(उ.बा.ठा)पक्षात शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते आंबादास दानवे व हिंगोली जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर प्रवेश केल्याने महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांना हिंगोली विधानसभेत मोठे मताधिक्य मिळेल असे राजकीय वर्तुळातुन बोलल्या जात आहे.दिनकरराव देशमुख यांनी शिवसेनेत अनेक पदावर काम केले असुन हिंगोली विधानसभा मतदारसंघात दांडगा जनसंपर्क असल्याने व वेळोवेळी शिवसेनेत शेतकरी,शेतमजुर,सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी आंदोलने करुन न्याय देऊन शिवसेना पक्ष वाढीसाठी अहोरात्र प्रयत्न केले होते.देशमुख हे स्वगृही परतल्याने शिवसैनिकामध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचे दिसुन येते.यावेळी हिंगोली जिल्हाप्रमुख संदेश देशमुख,सह संपर्कप्रमुख सुनिल काळे,उप जिल्हाप्रमुख गणेश शिंदे,अनिल‌ कदम,माजी सरपंच रामगोपाल भाऊ गट्टाणी,दिलीपराव देशमुख,माजी कृ.उ.बा.समिती संचालक नारायण झाडे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते......

✍🏻शिवशंकर निरगुडे (हिंगोली)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या